Pandharpur News : पांडुरंगाला आमची कणव असेल, तर तो मंत्रिमंडळाचा विस्तार करेल. पांडुरंगाला काय कोडं पडलं आहे, ते सोडव, असं आम्ही आता रुक्मिणीमातेला सांगणार आहोत. आता आमच्या हातात काही नाही. पांडुरंग आणि रुक्मिणीमातेने काय चमत्कार केला तरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले. (MLA Bharat Gogawle trusts Pandurang regarding cabinet expansion)
आमदार भरत गोगावले हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नावर गोगावले यांनी आता आमच्या हातात काही नाही, असे सरळ सांगून टाकले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भरत गोगावले म्हणाले की, पांडुरंगाच्या दारात आम्ही आलेलो आहोत. पांडुरंगाला आमची कणव असेल, तर तो मंत्रिमंडळाचा विस्तार करेल. दरवर्षी आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतच असतो. यापुढे ते कायम राहील. मंत्रिपद मिळालं तरी येऊ, नाही मिळालं तरी येऊ.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ पाहतोय. छगन भुजबळ हे त्यांच्या परीने बोलत आहेत. मात्र, मंत्री असल्यामुळे भुजबळ यांनी टोकाची वक्तव्ये करू नयेत, असं त्यांना सगळ्यांकडून सांगण्यात आलेले आहे, पण कधी कधी भावनेच्या आहारी माणूस बोलून जातो. पण, मला असं वाटतंय की, तुमचं आरक्षण जर आम्ही काढणार असेल तर तुम्ही बोला. आम्ही काढणारच नसू, तर तुम्हाला बोलायचा काय संबंध येतो, असा सवालही गोगावले यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनीच सांगितलं आहे की, कोणावर अन्याय करून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. मग तुम्हाला बोलायचं काय कारण आहे. आरक्षणासंदर्भात जेव्हा बैठका होतात, तेव्हा सर्वच समाजाचे प्रतिनिधी उपस्थित असतात. मराठा समाजाला आता देण्यात येणारं आरक्षण हे ठाम असेल. भले थोडासा उशीर होईल, पण पुन्हा पुन्हा कोर्टात कोणी जाता कामा नये, पुन्हा अडचण येता कामा नये, असे आरक्षण देण्यात येईल, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.