Jayant Patil
Jayant Patil  Sarkarnama
मराठवाडा

बीड, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांसाठी `गूड न्यूज`

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील (Godavari Basin) तीन जिल्ह्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने दिली आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मान्यता दिल्याने तीन जिल्ह्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास उपयोग होणार आहे.

गोदावरी पाणीतंटा लवादातील तरतूदीनुसार दिनांक ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित असून त्यानंतर ६० टीएमसी पाणी वापरास मान्यता दिलेली होती.

गोदावरी खोऱ्यात १९७५ च्या आधी पाणी वापर केलेला होता. त्यामध्ये पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या आता जलसंपदा विभागाने आता दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे आता मध्य गोदावरी उपखोऱ्यात एकुण (६० + ६१.२९ = १२१.२९) टीएमसी पाणी वापराचे नियोजन करणे शक्य आहे. हे लक्षात घेत १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास गुरुवारी मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे.

आता १९.२९ टीएमसी पाणी वापर मंजूर झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे.

जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. त्यातील काही प्रकल्प तिथे पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे पूर्णपणे दूर झाले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या तीन जिल्ह्यांत नव्याने उपसा सिंचन योजना, बंधारे बांधता येणार आहेत. हे पाणी खाली आंध्र प्रदेशात जात होते. ते आता अडविणे या निर्णयामुळे शक्य होणार आहे.

जयंत पाटील यांनी या भागात दौरा करत या भागातील प्रकल्पांचे प्रश्न जाणून घेतले होते. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यात जास्तीत जास्त पाणी देण्याचे आश्वासन दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT