Sharad pawar, jitendra Awhad, Jayant Patil Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil Shayari : जयंत पाटलांची शायरी अन् शरद पवारांची दाद; सभेत एकच हशा, नेमके काय घडले ?

Sharad Pawar Beed Sabha : शरद पवारांचा भाषण करणाऱ्या जयंत पाटलांना प्रेमळ चिमटा

Sunil Balasaheb Dhumal

Beed NCP News : राजकीय सभांमधून टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप, वार-पलटवार होतच असतात. विनोदी किस्से सांगून सभांमध्ये रंगत आणली जाते. यात अलिकडे शरो-शायरीचीही भर पडल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या बीडमधील सभेत असे सर्व प्रकार पाहायला मिळाले. मात्र जयंत पाटालांनी यावेळी शायर होत एक शायरी ऐकवली. याला पवारांनीही टोला लगावत दाद दिली. यामुळे सभेत एकच हशा पिकाला होता. (Latest Political News)

राष्ट्रवादीतील बंडखोरांसह भाजपविरोधात पवारांनी राज्यभर रान पेटवण्याचा विडा उचलला आहे. आपले सगळे गेले तरी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुन्हा पक्ष उभा करण्याचा निर्धार पवारांनी केला आहे. यातूनच मंत्री छगन भुजबळांच्या येवल्यानंतर गुरुवारी शरद पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये तोफ डागली. तत्पुर्वी जयंत पाटालांनी जोरदार 'बॅटिंग' करत भाजपसह राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा समाचार घेतला. भाजप जातीय दंगली घडवत असल्याची टीका करताना पाटलांनी एक शेर सांगितला.

"माझा शेरो-शायरी करण्याचा स्वभाव नाही, मात्र एक शेर आला आहे तो वाचून दाखवतो", असे म्हणत जयंत पाटलांनी एक शेर सांगितला.

"नफरतों का असर देखो, जानवरोंका बटवारा हो गया,

गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया।

ए पेड, ए पत्ते, ए शाखे भी परेशान हो जाए,

अगर परिंदे भी हिंदु और मुसलमान हो जाए।"

शेर एकताच लोकांनी टाळ्या वाजवल्या, तर पवारांनी वा.. वा.. वाह.. अशी दाद दिली. मात्र हा टोला असल्याचे लक्षात येताच सभेत एकच हशा पिकाला. यावर पाटलांनीही मिश्किल टिप्पणी करत "स्वाभावाच्या उलटे काही बोलले की साहेब अशीच 'रिअॅक्शन' देतात", अशी कबुली दिली. यानंतर मग खुद्द पवारांसह सभेतील सर्वानांच हसू आवरता आले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT