Sharad Pawar Beed Sabha : पवारांकडून क्षीरसागरांचे कौतुक, मोदींवर निशाणा ; पण मुंडेंना सोडले..

Marathwada Politics : उद्या मतदानाची संधी मिळेल तेव्हा लोक तुम्हाला कुठे पाठवायचं याचा विचार केल्याशिवाय राहणार नाहीत.
Sharad Pawar Beed Sabha
Sharad Pawar Beed SabhaSarkarnama
Published on
Updated on

Ncp Political News : राष्ट्रवादीतील बंडानंतर मराठवाड्यातील पहिली स्वाभीमानी सभा बीडमध्ये झाली. शरद पवारांनी या सभेत आटोपशीर भाषण केले. (Sharad Pawar Beed Sabha) यात सभेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार संदीप क्षीरसागर यांचे कौतुक केले, तर पंतप्रधान मोदींच्या मी पुन्हा येईनची खिल्ली उडवत टीका केली. परंतु धनंजय मुंडे यांच्याबद्दल पवार काहीच बोलले नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने पवारांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या गर्दीचा हिरमोड झाला.

Sharad Pawar Beed Sabha
Sharad Pawar Rally : `पंडित`च, पण पवारांनी बदामरावांच्या घरी भेट देत मार्ग बदलला..

दुपारी बारापासून शरद पवारांची वाट पहात लोक सभास्थळी बसले होते. अडीच वाजता शरद पवारांचे आगमन झाले, पण त्यानंतर डझनभर नेत्यांची भाषणं झाली आणि उपस्थितांचा उत्साह काहीसा कमी झाला. (Sharad Pawar) शरद पवार बोलायला उभे राहिले तेव्हा गर्दीमध्ये पुन्हा उत्साह संचारला, पण अवघ्या १५ ते २० मिनिटात पवारांनी भाषण आटोपते घेतले. (Beed News) या छोटेखानी भाषणात त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला ओझरता हात घातला. पण धनंजय मुंडे यांच्यावर कुठलीच टीका केली नाही.

बीडमध्ये येऊन पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका न करण्यामागे त्यांना अधिक महत्व न देण्याची रणनिती असू शकते असे बोलले जाते, पण ज्यांच्याविरोधात पुढील काळात लढायचे आहे, त्यालाच सोडल्याची चर्चा सभेतून बाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये होतांना दिसत होती. (NCP) अजित पवार यांच्या बंडामध्ये धनंजय मुंडे, (Dhananjay Munde) अमरसिंह पंडीत यांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळे पवार आपल्या भाषणातून त्यांचा समाचार घेतील अशी अपेक्षा होती. पण अमरसिंह पंडित यांचा एका वाक्यात उल्लेख करत पवारांनी त्यांना टोला लगावला.

पवारांनी आपल्या भाषणात देशातील अनेक राज्यात बिघडेलेली कायदा व सुव्यवस्था, मणिपूरमध्ये जाळली जाणारी घरे, स्त्रीयांची काढली जाणारी धिंड आणि त्यावर न बोलणारे पंतप्रधान यावर टीका केली. लाल किल्ल्यावरील भाषणातून मोदींनी केलेल्या `मी पुन्हा येईन`, ची खिल्ली पवारांनी बीडमध्ये उडवली. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणाले होते, ते आले पण खालच्या रॅंकवर. तेव्हा मोदींनी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, आणि पुन्हा कोणत्या पदावर यायचे हे ठरवावे, असा टोला लगावला.

ठाण्यातील सरकारी रुग्णालयात दगावलेल्या १८ जणांचा उल्लेख करत पवारांनी राज्य सरकारवरही टीका केली. सभेतील उत्साह पाहून जुन्या काळाची आठवण झाल्याचे पवार म्हणाले. लोकांसमोर राहणार नेतृत्व तडजोड करणार नसल की लोक त्यांच्यासोबत राहतात. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असतांना असाच प्रसंग आला. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे नेतृत्व होते, तेव्हा असा काळ येवून गेला, वेगळी भूमिका मांडल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

Sharad Pawar Beed Sabha
Sharad Pawar Beed Sabha : 'डबल इंजिन' असलेल्या राज्यांतच हिंसाचार; जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात

या जिल्ह्याचं नेतृत्व केशरकाकू यांच्याकडे होते, काकूंनी भूमिका घेतली, तिच भूमिका आज त्यांच्या नातवाने घेतली याचा मला आनंद आहे, असे म्हणत त्यांनी संदीप क्षीरसागर यांचे कौतुक केले. आज शेतकऱ्यांना काय मिळतं, खताच्या किंमती कुठे गेल्या, शेतकरी अडचणीत आहे. कायदा आणि सुव्यवस्था याची जबाबदारी केंद्र आणि राज्याची असते, त्याची काय परिस्थिती आहे. पाकिस्तान, चीनची नजर भारताकडे चांगली नाही. संकट आलं की काय होईल हे सांगता येत नाही.

समाजासमाजामध्ये, गावागावांत भांडण आहेत. हल्ले होतायेत, घर जाळली जातायेत, स्त्रीयांची धिंड काढली जात आहे. हे सगळं होत असतांना सरकार मात्र दुसऱ्या प्रकारची पावलं टाकत आहे. पंतप्रधान मणिूपरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी गेले नाही. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात तीन मिनिटं फक्त मणिपूरवर ते बोलले. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकार पाडण्याचे काम चालू आहे. स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि लोकांनी निवडून दिलेली सरकार केंद्राची सत्ता वापरून उद्धवस्त करता, अशी टीका पवारांनी भाजपवर केली.

Sharad Pawar Beed Sabha
Sharad Pawar Rally : पाचोडमध्ये शरद पवारांचे भुमरेंना धडकी भरवणारे स्वागत..

जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे शहरातील सरकारी रुग्णालयात १८ लोकांचे जीव गेले, पण राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे, चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. आमच्या लोकांना महिनो महिने तुरुंगात टाकले गेले. परळीत देखील असा प्रकार घडला, असे म्हणत पवारांनी अप्रत्यक्षरित्या करुणा मुंडे यांच्यावर झालेल्या कारवाईकडे लक्ष वेधण्याचा पवारांनी प्रयत्न केला. अस राजकारण करणाऱ्यांना उखडून टाकायला वेळ लागणार नाही, असा इशारा पवारांनी यावेळी दिला. जिल्ह्याचे नेते त्यांना काय झाले माहित नाही. अमरसिंह पंडित पक्ष सोडून गेला, चौकशी केली तेव्हा कळालं की त्यांना अस सांगितलं गेलं की पवार साहेबांचा वय झालं आहे, आता दुसरा नेता निवडला पाहिजे. माझ वय झाल म्हणता, तुम्ही माझ काय पाहिलं, असा टोला शरद पवारांनी लगावला.

माणुसकी ठेवा, हे नाही केलं तर लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपच्या दावणीला जाऊन बसलात. उद्या मतदान करण्याची संधी लोकांना जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला कुठे पाठवायचं याचा विचार लोक केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही पवारांनी यावेळी दिला. शरद पवारांनी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांच्यावर थेट टीका करणे टाळल्याचे यावेळी दिसून आले. चांगल्या माणसांना आशिर्वाद द्या, या मुंडे यांनी शहरात लावलेल्या बॅनरचा उल्लेख आव्हाड, अनिल देशमुख, जयंत पाटील या सगळ्याच नेत्यांच्या भाषणातून झाला. पण पवारांनी मात्र या मुद्याला महत्वच दिले नाही.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com