Sharad Pawar Beed Sabha : 'डबल इंजिन' असलेल्या राज्यांतच हिंसाचार; जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात

Jayant Patil On BJP, Ajit Pawar : ठाणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नगरमधेही दंगली घडल्या
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed NCP News : मणिपूर पेटलेले असतानाही त्यावर चकार शब्द कुणी काढला नाही. हरियाणतही तीच स्थिती आहे. गुजरात, दिल्ली, केरळ असो इतर कुठल्याही राज्यात महिला सुरक्षित नाहीत, तेव्हा लोकांनी कुणाकडे पाहायचे ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मोदी सरकारवर घणाघात केला. डबल इंजिनचे सरकार असलेल्या राज्यांत जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही ठाणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नगरमधेही दंगली घडल्या, हे सांगून पाटलांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा समाचार घेतला. (Latest Political News)

बीडमध्ये पवारांची सभा झाली. या सभेत पाटलांनी जोरदार फटकेबाजी करत मोदी सरकारसह शिंदे फडणवीसांचे राजकारण, राष्ट्रवादीतील बंडखोरांवर हल्ले चढवले. "पूर्वी दिल्लीश्वरांचे राज्य देशभर होते. त्यावेळी प्रत्येकाने स्वाभिमान नावाची चीज गहाण ठेवली होती. त्यावेळी स्वाभिमानाच्या विचारांची शिकवण शिवरायांनी दिली. त्यानंतर स्वराज्यसरक्ष संभाजी महाराजांनीही स्वाभिमान म्हणजे काय असतो हे जगाला दाखवून दिले. तह झाले, आक्रमण झाले मात्र त्यांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य निर्माण केले. हे फुटीरांना कसे समजणार", असे सांगून पाटलांनी बंडखोरांवर घेरले.

Jayant Patil
Jitendra Awhad Beed Speech: '' शरद पवारांना धनंजय मुंडेंना पक्षात घ्यायचंच नव्हतं, त्यांनी गोपीनाथ मुंडेंना...'' ; आव्हाडांचा गौप्यस्फोट

सध्या राजकाराणाचा पोत बदलल्याचे सांगून जयंत पाटील म्हणाले, "राज्याच्या राजकारणाला मोठी परंपरा आहे. शाहू-फुले-आंबेडकारांचे नाव आपण कायम घेतो. त्यांनी प्रेमाचे राजकारण केले, सूडाचे नाही. सत्तेसाठी कायपण ही भूमिका राज्यात दोन वेळा दिसली. विचारांची फारकत घेताना काही लोक दिसले. राष्ट्रवादीतील नवाब मलिक, अनिल देशमुखांनाही तुरुंगवास भोगावा लागला. पुढे कितीही आव्हाने उभी असली तरी ते विचाराच्या बाजूने आहेत."

Jayant Patil
Sandeep Kshirsagar Mimicry: संदीप क्षीरसागरांनी पुन्हा केली धनंजय मुंडेंची नक्कल; म्हणाले, ‘कुणाचाही नाद करा; पण....’

पाटलांनी एका आहवालाचा दाखल देत देशभारत झालेल्या घोटाळ्यांची यादीही वाचून दाखवली. "गेल्या महिन्यात महागाईचा दर ७.४४ टक्क्यांनी वाढला. दररोज वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य लोकांच्या अडचणीत भर पडत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाचा भाव, पाण्याची टंचाई, महागाई, अत्याचार वाढत असूनही यावर सरकार बोलत नाही. सत्ताधारी फक्त पक्ष फोडण्यातच मश्गूल आहेत. संख्याबळ असतानाही पक्ष का फोडले जातात, असा प्रश्न लोक विचारत आहेत." मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्याची वेळी आल्याचेही आवाहनही पाटलांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com