Badamrao Pandit-Jaydatta Kshirsagar Political Shift News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : जयदत्त क्षीरसागरांची चाचपणी, तर बदामराव पंडितांची पाऊले भाजपकडे

Pandit-Kshirsagar Political Shift In Beed : आता क्षीरसागर पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांची भाजपमध्ये प्रवेशाची बोलणीही पुर्ण झाली होती. मात्र, पुन्हा एका म्यानात दोन तलवारीचा मुद्दा आल्याने त्यांनी आपली वाट राष्ट्रवादीकडे वळविल्याची माहिती आहे.

Jagdish Pansare

  1. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर नव्या राजकीय पक्षासाठी चाचपणी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

  2. दुसरीकडे, बदामराव पंडित लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

  3. या दोन्ही हालचालींमुळे बीडच्या राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दत्ता देशमुख

Marathwada Political News : जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून पक्षप्रवेशासाठी चाचपणी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांची बोलणीही अंतिम टप्प्यात आहे. तर, इकडे गेवराईचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनीही भाजपमध्ये जाण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे गेवराईत पंडित - पवार एकाच पक्षात दिसू शकतील.

पंचायत समिती सभापतीपदाच्या माध्यमातून राजकीय वाटचाल सुरु करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी चौसाळा, बीड मतदार संघातून विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. उपमंत्री, राज्यमंत्री व कॅबीनेटमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. काँग्रेस विचाराचे क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून 1999 ते 2019 पक्षात होते. मात्र, त्यांच्या विरोधात बंड करणारे पुतणे संदीप क्षीरसागर यांना पक्षातील नेत्यांकडून बळ दिले गेल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतानाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत थेट प्रितम मुंडे यांचा प्रचार केला.

परंतु, एका म्यानात दोन तलवारी (पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागर दोघेही ओबीसी नेते असल्याने) बसल्या नाहीत व त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनेही त्यांना मंत्रीपद आणि विधानसभेची उमेदवारीही दिली. परंतु, पराभवानंतर शहरातील विकास कामांच्या भूमिपुजनावरुन त्यांचा शिवसेनेसोबतही दुरावा झाला. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतून ऐनवेळी माघारीनंतर आता क्षीरसागर पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांची भाजपमध्ये प्रवेशाची बोलणीही पुर्ण झाली होती. मात्र, पुन्हा एका म्यानात दोन तलवारीचा मुद्दा आल्याने त्यांनी आपली वाट राष्ट्रवादीकडे वळविल्याची माहिती आहे. मतदार संघाचे नेतृत्व आणि सुत्र या दोन अटींवर त्यांच्या प्रवेशाचे घोडे सद्यघडीला अडलेले आहे. मात्र, यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे गेवराई मतदार संघातून तीन वेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे बदामराव पंडितांनी देखील कमळ हाती घेण्याचे सुतोवाच केले आहेत. चुलतबंधू शिवाजीराव पंडित यांच्या विरोधात बंड करुन 1995 आणि 1999 साली बदामरावांनी अपक्ष बाजी मारली. तर, 2009 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधीमंडळात पोचले. मागच्या काही वर्षांपासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत होते. आता त्यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचे सुतोवाच केले आहेत.

तर, पवार - पंडित एकत्र

मागच्या 50 वर्षांचा इतिहास पाहिला तर गेवराईचे राजकारण सुरुवातीला पंडित विरुद्ध पवार असे राहीले. पुढे शिवाजीराव पंडितांना बदामराव पंडितांनी आव्हान दिल्यानंतर 1995 ते 2014 पंडित विरुद्ध - पंडित असेच राहीले. या काळात माजी आमदार लक्ष्मण पवार यांना नगरपालिकेसाठी अमरसिंह पंडित यांच्याकडून मदत असे. 2014 ला बदामराव पंडित व अमरसिंह पंडित एकत्र आले आणि गेवराईत लक्ष्मण पवारांनी बाजी मारली.

भाजपकडून दोन टर्म आमदार राहीलेल्या लक्ष्मण पवार यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला स्वत:हुन सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणुक लढविली. त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर प्रकृतीच्या कारणाने सध्या ते राजकारणापासून अंतर राखून आहेत. शिक्षा संपवून परतलेले त्यांचे बंधू बाळराजे पवार भाजपच्या माध्यमातून सक्रीय झाले आहेत. आता बदामराव पंडितांची पाऊले देखील भाजपकडे वळल्याने आता पंडित व पवार एकत्र दिसू शकतात.

FAQs

1. जयदत्त क्षीरसागर कोणत्या नव्या पक्षाच्या संपर्कात आहेत?
अद्याप पक्षाचे नाव जाहीर नाही, मात्र त्यांनी काही नव्या पक्षांशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे.

2. बदामराव पंडित भाजपमध्ये कधी प्रवेश करणार?
सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

3. या हालचालींचा बीडच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सत्तासमीकरणे बदलू शकतात.

4. क्षीरसागरांचा पक्षबदल निश्चित आहे का?
अजून निर्णय अंतिम नाही, पण ते नवा पर्याय शोधत आहेत असे सांगितले जाते.

5. भाजपकडून बदामराव पंडित यांना कोणती जबाबदारी मिळू शकते?
भाजप त्यांना बीड जिल्ह्यात संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाची जबाबदारी देऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT