MLA Rohit Pawar Beed News Sarkarnama
मराठवाडा

MLA Rohit Pawar On Beed : राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन् गुंड असा आहे 'बीड पॅटर्न'

Judicial committee formed in Beed murder case-Rohit Pawar expresses satisfaction : या पॅटर्नमध्ये लोकांना धमकावून किंवा प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून कराडची टोळी हवे ते मग ते काहीही असो, असे सर्व प्राप्त करून घेते. सहा सात महिन्यांपूर्वी याच पद्धतीने कराड टोळीने बबन गीतेंना सुद्धा अडकवले होते.

Jagdish Pansare

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात बीड पॅटर्नची चर्चा आणि दहशत पसरली आहे. खंडणी आणि त्यातून सरंपचांची झालेली निर्घूण हत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातवारण बिघडले आहे. पिडित आणि आरोपी अशा दोन्हींच्या बाजूने लोक रस्त्यावर उतरल्याने या प्रकरणाला जातीय वळण लागले आहे. अशातच सरकारने बीड (Beed News) प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती नेमली.

माजी न्यायमुर्ती एम.एल.तहलियानी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या न्यायालयीन समितीच्या नियुक्तीवर समाधान व्यक्त केले आहे. बीड प्रकरणात उशिरा का होईना सरकारने अखेर न्यायालयीन समिती नेमली व समितीत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या माजी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांची नेमणुक केल्याबद्दल सरकारचे रोहित पवार यांनी आभार मानले आहेत.

बीडमधील गुन्हेगारीचा पॅटर्न हा राजकीय आश्रय,मर्जीतले प्रशासन आणि गुंड अशा तीन स्तंभांवर आधारलेला असून अत्यंत घातक आहे. या पॅटर्नमध्ये लोकांना धमकावून किंवा प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून कराडची टोळी हवे ते मग ते काहीही असो, असे सर्व प्राप्त करून घेते. सहा सात महिन्यांपूर्वी याच पद्धतीने कराड टोळीने बबन गीतेंना सुद्धा अडकवले होते.

तपास केला तर अशा असंख्य घटना समोर येतील, असा दावा पवार यांनी आपल्या 'एक्स'वरील प्रतिक्रियेत केला.न्यायालयीन समिती खोलात जाऊन पारदर्शक तपास करून गुंडगिरीचा हा पॅटर्न मोडून काढेल ही अपेक्षा आणि संघर्षाची कष्टकऱ्यांची भूमी असलेला तसेच मोठा वैचारिक वारसा लाभलेला बीड जिल्हा गुंडगिरीच्या ग्रहणातून मुक्त होईल, हा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आठ आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर प्रचंड दबावानंतर मकोका लावण्यात आला. एसआयटीने कराडचा ताबा घेत त्याला पोलीस कोठडीत घेतले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठीही दबाव वाढत आहे. रोहित पवार यांनी मस्साजोगला भेट देऊन पडीत देशमुख कुटुंबियांची भेट घेत या लढ्यात सर्व आरोपींना शिक्षा होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू, अशी ग्वाही दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT