Santosh Deshmukh Case : सीएम फडणवीसांनी अधिवेशनात दिलेला शब्द पाळला, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नव्या समितीची 'एन्ट्री'

CM Devendra Fadnavis News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. त्यातच या प्रकरणात दररोज मोठं-मोठे खुलासे होत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
CM Devendra Fadnavis, Valmik Karad, Santosh Deshmukh
CM Devendra Fadnavis, Valmik Karad, Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता बीड (Beed) प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे. तर निवृत्त न्यायाधीश एम.एल ताहलियानी आणि परभणी प्रकरणात व्ही.एल अचलिया यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून बीड आणि परभणी प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची बुधवारी(ता.15) घोषणा करण्यात आली आहे. याबाबतचा जीआर सरकारकडून काढण्यात आला आहे. ही समिती या दोन्ही प्रकरणांत कोणालाही चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे आता न्यायालयीन चौकशी समितीच्या एन्ट्रीनं बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाच्या धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. त्यातच या प्रकरणात दररोज मोठं-मोठे खुलासे होत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

CM Devendra Fadnavis, Valmik Karad, Santosh Deshmukh
Walmik Karad Wife Statement : अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या देखील गोष्टी बाहेर काढणार...

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं नागपूरमधलं महायुती सरकारचं सत्ता स्थापनेनंतरचं पहिलंच अधिवेशन विरोधी पक्षनेता नसतानाही वादळी ठरलं होतं.या अधिवेशनात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशमुख हत्येप्रकरणी सभागृहात धक्कादायक माहिती सांगताना संपूर्ण सभागृह अक्षरश:स्तब्थ होतं.

त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या हत्येप्रकरणातल्या एकाही आरोपीला सोडणार नाही असा शब्द देतानाच दुसरीकडे या प्रकरणात न्यायालयीन चौकशी समितीची निुयक्ती करण्यात येईल अशी घोषणा केली होती.

CM Devendra Fadnavis, Valmik Karad, Santosh Deshmukh
Atul Save-Sanjay Shirsat News : संभाजीनगरकरांनो, तुमचा पालकमंत्री कोण होणार; शिरसाट की सावे!

संतोष देशमुख कुटुंबियांनी घेतलेल्या भेटीवेळीही फडणवीसांनी या प्रकरणात कोणी कितीही मोठा असला, आणि त्याचे कोणाही बड्या नेत्याशी संबंध असले तरी त्याला सोडणार नाही असा शब्द त्यांना दिला होता. त्याच दिशेनं त्यांनी पावलं टाकतानाच तपासाला गती मिळावी यासाठी एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसून येत आहे.

बीड हत्या प्रकरणाचा तपास आता माजी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केला जाणार आहे. ताहलियानी हे निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक गाजलेल्या प्रकरणांत न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे. त्यात 26/11चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा खटला, तसेच प्रसिद्ध दिवंगत गायक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यावेळीदेखील न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

आता त्यांच्यावर राज्य सरकारनं त्यांच्यावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com