Walmik Karad : वाल्मिक कराडचं थेट अमेरिका कनेक्शन? जप्त केलेल्या मोबाईलमुळे धक्कादायक माहिती आली समोर

Walmik Karad shocking revelations : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींनी देशमुख यांचे अपहरण करुन खून केला याच काळात त्यांनी वाल्मिक कराडला कॉल केल्याचं सीडीआरवरुन दिसत आहे, असा दावा एसआयटीने केला आहे.
Walmik Karad
Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 16 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींनी देशमुख यांचे अपहरण करुन खून केला याच काळात त्यांनी वाल्मिक कराडला कॉल केल्याचं सीडीआरवरुन दिसत आहे, असा दावा एसआयटीने केला आहे. कराडबाबत दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असतानाच आता त्याचं थेट अमेरिका कनेक्शन असल्याचा संशय एसआयटीला आहे.

वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मकोका लावल्यानंतर त्याला बुधवारी (ता.15) बीड न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा नेमका काय सहभाग आहे? त्याचे फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय कनेक्शन आहे?

याबाबतचे सीडीआर तपासायचे असून यासाठी त्याची 10 दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तीवाद न्यायलयात करण्यात आला. शिवाय देशमुख यांची हत्या झाली या काळात आरोपींनी वाल्मीक कराडशी फोनवरून संपर्क केल्याचं सीडीआरवरुन दिसत असल्याचंगी एसआयटीने कोर्टात सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Walmik Karad
Walmik Karad Property: कराडला 24 तासांत सलग चौथा मोठा धक्का; PCMC नं कोट्यवधींची प्राॅपर्टी केली 'सील'; 'हे' आहे कारण

अशातच आता कराडचे जे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यामधील काही सिमकार्ड अमेरिकेत रजिस्टर झाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या काळात या सिमकार्डवरुन काही लोकांना त्याने फोन केल्याचा संशयही एसआयटीला असून कराडचं सिम अमेकिरेत का रजिस्टर आहे आणि त्याने यावरून कोणाकोणाला फोन केले? याबाबतचा तपास एसआयटीकडून केला जाणार आहे.

चौकशी समितीची घोषणा

दरम्यान, नागपूरमधील महायुती सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता या हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश एम.एल ताहलियानी आणि परभणी प्रकरणात व्ही.एल अचलिया यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन चौकशी समितीची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

Walmik Karad
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख यांची हत्या का झाली? सीआयडीने खरे कारण पहिल्यांदाच आणले समोर; कोर्टात केला 'हा' युक्तिवाद...

राज्य सरकारकडून बीड आणि परभणी प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीची बुधवारी घोषणा करण्यात आली. याबाबतचा जीआर सरकारकडून काढण्यात आला आहे. ही समितीला दोन्ही प्रकरणांत कोणालाही चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे आता न्यायालयीन चौकशी समितीच्या एन्ट्रीनं बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला वेग येणार असून अनेक महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com