K. Chandrashekhar Rao : Bharat Rashtra Samiti :
K. Chandrashekhar Rao : Bharat Rashtra Samiti :  Sarkarnama
मराठवाडा

K. Chandrashekhar Rao : 'अब की बार किसान सरकार' : केसीआर यांचा महाराष्ट्रात येऊन एल्गार!

सरकारनांमा ब्यूरो

K. Chandrashekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के. चंद्रशेखर राव यांची नुकतीच नांदेडमध्ये सभा झाली. केसीआर यांच्या बीआरएस (भारत राष्ट्र समिती) चे अनेक नेते, मंत्री, खासदार, आमदार या सभेच्या तयारीसाठी नांदेडमध्ये तळ ठोकून होते. या सभेत त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांना संबोधित करत मोदी सरकार अन् काँग्रेसवर बरसून टीका केली.

राव म्हणाले, "साधी गोष्ट आहे, स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतर ही प्यायला पाणी आहे, सिंचनासाठी पाणी नाही, या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करतात. याचं चिंतन झालं पाहिजे. अन्नदाताच आत्महत्या का करतो? काय कारण आहे. भाषण होतं, पण काम होत नाही. यासाठी बीआरएस चा नारा आहे की, "अब की बार किसान सरकार." असा नारा देत आता त्यांनी पक्षाला राष्ट्रीय स्वरूप देण्याच्या दिशेने एल्गार पुकारला आहे.

"शेतकऱ्यांनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी. धर्माच्या, वेगवेगळया रंगाच्या राजकारणाला बळी पडू नये. शेतकरी आणि कष्टकरी मिळून आपण ५० % आहोत. सरकार बनवण्यासाठी एवढं पुरेसं आहे. भारत बुद्धीजीवींचा पक्ष आहे, बुद्धूंचा नाही," असे आवाहन ही राव यांनी केले.

"आज वेळ आली शेतकरी बांधवांनो, स्वत: आमदार, खासदार बना, स्वत:चं सरकार बनवा. जेव्हा निवडणुक येते तेव्हा नेते जिंकतात, जनता हरते, पण आता यापुढे जनता जिंकली पाहिजे. आपला देश अमेरिकेपेक्षाही बलवान देश आहे. फक्त तो करणारा असेल तर आपण पुढे जावू शकतो. देशातल्या संपत्ती पासून जनता वंचित आहे. असं का आहे? याचा विचार झाला पाहिजे," असे राव म्हणाले.

"महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत. तरी इथे पाण्याचं दुर्भिक्ष्य का आहे? पंच्याहत्तर वर्षात काय झालं. काँग्रेस आणि भाजपने या देशावर आजपर्य़ंत राज्य केलं. पण तरी प्रश्न सुटले नाहीत. जनतेला समाधान मिळालं नाही. तु किती खाल्लं, मी किती खाल्लं, कधी अंबानी तर कधी अदानी, असं होत राहिलं," असे राव म्हणाले.

"मेक इन इंडिया मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प होता, पण भारतात सगळीकडे चायना बाजार भरतो. खेळणी, पतंगाचा मांजा, दिवाळीचे दिवे सगळे चायनावरून येतं, मग मोदींच्या मेक इन इंडियाचं काय झालं? असा सवालं केसीआर यांनी विचारला," अशी टीका ही राव यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT