Kailas Patil News Sarkarnama
मराठवाडा

Kailas Patil News : भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका ; ठाकरेंच्या आमदाराचा कृषीमंत्र्यांना टोला!

Kailas Patil agriculture minister criticism : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी कृषीमंत्री भरणे मामा यांच्यावर शेतकरी प्रश्नांवरून टीका केली. महाराष्ट्रातील राजकारणातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.

Jagdish Pansare

Assembly Session News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. ऑपरेशन टायगरने पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षात फूट पडली. सहा खासदार पक्ष सोडून गेल्याने ठाकरेंच्या पक्षात संतापाचे वातावरण आहे. अशातच शेतकरी, महिला, राज्यातील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी यासारखे गंभीर विषय आवासून समोर उभे आहेत. सत्ताधारी पक्ष मात्र फक्त फोडाफोडी अन् ऑपरेशन टायगर करण्यात व्यस्त असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार विधीमंडळात सरकारवर तुटून पडले आहेत. शिवसेनेचे धाराशिव-कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी कृषी विभागाच्या फसव्या योजनांवरून कृषीमंत्री दत्ता भरणे यांना उद्देशून सभागृहात चांगलेच टोले लगावले. शेतकरी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ हौसेने घेत नाही. गरज असल्यामुळे तो अर्ज करतो.

कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाखो शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने अर्ज केले. मात्र ज्या दिवशी लाभार्थ्यांची लॉटरी जाहीर झाली, त्याच दिवशी त्रुटी पूर्तीसाठी आवश्यक असलेली वेबसाईट बंद होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत, याकडे त्यांनी कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले...

वेबसाईट उपलब्ध नसताना त्रुटीची पूर्तता करायची कशी? प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? अखेर याच कारणावरून तब्बल 94 टक्के अर्ज रद्द करण्यात आले. हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय असून सरकारने स्वतःची चूक शेतकऱ्यांच्या माथी मारली आहे. सरकार मोठमोठ्या घोषणा करते, जाहिरातींमध्ये योजनांचा गाजावाजा करते, पण प्रत्यक्ष लाभ देण्याची वेळ आली की नियम, अटी आणि तांत्रिक अडचणींच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडते, असा आरोप कैलास पाटील यांनी केला.

सरकारने लाखो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्याऐवजी त्यांना पुन्हा संधी द्यावी, त्रुटी पूर्तीसाठी वेबसाईट सुरू करावी आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने कृषी यंत्रांचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे मागणी केली. भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका, असा टोलाही पाटील यांनी कृषी मंत्र्यांना लगावला.

कर्जमाफी की कर्जवसुली?

महायुती सरकारने 2024 पासून कर्जमाफीचा अभ्यास करून 2026 मध्ये घोषणा केली. मात्र अटी-शर्तींच्या जंजाळामुळे ही कर्जमाफी आहे की कर्जवसुली, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सरकारने दिखाऊ घोषणा नव्हे, तर अटी-शर्ती विना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणीही कैलास पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT