Kailas Patil, Eknath shinde sarkarnama
मराठवाडा

Assembly Winter Session : उत्पन्न नाही सरकारने खर्च दुप्पट केला! आमदार कैलास पाटील यांचा हल्ला

Kailas Patil : सोयाबीनला दहा वर्षात फक्त १६१ रुपये वाढ

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv : शेतकऱ्यांचे उत्पन्न तुप्पट करण्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या दाव्यातील हवाच आमदार कैलास पाटील (Kailas Patil ) यांनी काढून घेतली. दहा वर्षात सोयाबीनच्या दरात केवळ 161 रुपयांची वाढ झाली. कांद्याला भाव मिळणार असे दिसताच सरकार निर्यातबंदी करुन शेतकऱ्यांचे नुकसान केलं. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु म्हणणाऱ्या उत्पन्न नाही तर उत्पादन खर्च दुप्पट केला, असा घणाघात आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत सरकारवर केला.

सरकार किसान योजनेचा गवगावा करते पण लाभार्थी लाखाने कमी झालेत.पहिल्या हप्तावेळी दोन लाख 93 हजार शेतकरी होते पण आता फक्त 79 हजारच शेतकरी लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला तर अशा पैशाची शेतकऱ्यांना गरज देखील लागणार नाही, असे पाटील यांनी सुनावले.

राज्यातले उद्योग गुजरातला पळविले जातात. तेव्हा सरकार म्हणते यापेक्षा मोठा उद्योग पंतप्रधान मोदी राज्याला देणार आहेत. कुठे आहे तो उद्योग असा प्रतिप्रश्न पाटील यांनी मुख्यमंत्र्याना केला. एमपीएससीची जुन्या पध्दतीने होणारी ही शेवटची परिक्षा असणार आहे. त्यामुळे आता सर्व रिक्त जागेची जाहीरात काढुन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी देखील त्यांनी सभागृहात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस भरतीच्या मुद्यावर देखील पाटील यांनी गृहविभागाला टार्गेट केलं. गृह विभागातील ५७ हजार जागा रिक्त आहेत त्या भरला जात नाहीत.पोलिस पाटील, होमगार्ड या घटकांनाही न्याय देण्याची गरज आहे. महिला देखील सुरक्षित नाहीत. 2019 साली धाराशिव शहरासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सीसीटीव्हीसाठी पैसे दिले पण अजुनही ते लावले नसल्याने सरकारची गतीमानता लक्षात येते, असे पाटील म्हणाले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT