MPSC Exam News: एमपीएससी परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय; चार सदस्यांची समिती स्थापन

MPSC News: राज्यात काही ठिकाणी पेपरफुटीच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.
MPSC Exam News
MPSC Exam NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात काही ठिकाणी पेपरफुटीच्या घटना घडल्या होत्या. आता या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एमपीएससी परीक्षांबाबत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती पेपरफुटी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणार असून परीक्षांची प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी काम करणार आहे.

या समितीमध्ये दोन सेवानिवृत्त आयएएस व एका सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पेपरफुटी टाळण्यासाठी आवश्यक त्या सूचना आणि पुढील तीन महिन्यांत समितीला अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये किशोर राजे निंबाळकर, सुरेश काकाणी, डॉ. शहाजी सोळुंके यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MPSC Exam News
Shivsena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; निकालाबाबत...

दरम्यान, काही दिवसांपासून राज्यातील अनेक विभागांची सरळसेवा भरती सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी पेपर फुटीच्या घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. यानंतर पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात आली.

याबरोबरच पेपर फुटीच्या घटनांवरून विरोधी पक्षानीही सरकारवर जोरदार टीका केली होती. यानंतर आता राज्य सरकारने तातडीने पावलं उचलत चार सदस्यीय समिती स्थापन केली. त्यामुळे ही समिती सरकारला काय अहवाल सादर करते, तसेच पेपरफुटी टाळण्यासाठी काय उपाययोजना करते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

MPSC Exam News
Mahua Moitra Case : महुआ मोईत्रांना पुन्हा मिळणार खासदारकी? 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणी आज सुनावणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com