Santosh Bangar, Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar : "बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी फोन..."; शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाले?

Santosh Bangar MLA Of Kalmanuri Assembly Elections News : हिंगोलीच्या कळमनुरी येथील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी थेट मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Jagdish Patil

Kalmanuri Assembly Elections News : निवडणुका म्हटलं की विविध राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरमसाठ आश्वासनं दिली जातात. मात्र, राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर आणि सभांवर काही आर्थिक मर्यादा निवडणूक आयोगाकडून (Election Commission) घालण्यात येते.

तरीही निवडणुकीच्या (Election) काळात मोठ्या प्रमाणात मतदारांना पैसे वाटले जातात हे उघड गुपित आहे. नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, 'राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काहींनी आपापल्या उमेदवाराच्या मतदारसंघात 10 ते 15 कोटी पोहोचवले आहेत', असा आरोप केला होता.

अशातच आता शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी थेट विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हिंगोलीच्या कळमनुरी येथील एका कार्यक्रमात बोलताना बांगर (Santosh Bangar) म्हणाले, "बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांत द्या, त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा, त्यांना सांगा येण्या-जाण्याचे जे काही लागते ते आम्हाला सांगा."

त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना बांगर यांनी थेट पैशाचे अमिष दाखवल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग बांगर यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महायुतीचं (Mahayuti) जागावाटप जाहीर होण्याआधीच बांगर यांनी आपली उमेदवारी जाहीर होण्याआधीच थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख सांगितली आहे. त्यानुसार ते येत्या 24 तारखेला कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे सतत चर्चेत असतात. अशातच आता मतदारांना आणण्यासाठी फोन पे करण्याची भाषा केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT