Shivsena UBT : नारायण राणेंना मोठा धक्का, कट्टर समर्थक ठाकरे गटात; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचेही वाढणार टेन्शन

Rajan Teli join Shivsena UBT : उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिवसेनेत आज पाच पक्षप्रवेश झाले आहेत. चांगले कार्यकर्ते, माणसं शिवसेनेत येत आहेत. राजन तेली आमचाच. पण मधल्या काळात त्याची दिशाभूल झाली होती.
Rajan Teli join Shivsena UBT
Rajan Teli join Shivsena UBT sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : नारायण राणेंचे कट्टर समर्थक, अशी ओळख असलेले राजन तेली यांनी शिवसेना (यूबीटी) पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतमध्ये हा पक्षप्रवेश 'मातोश्री'वर झाला. राजन तेली यांचा शिवसेनेत (यूबीटी) प्रवेश हा नारायण राणेंसाठी मोठा धक्का आहे.

राजन तेली हे सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आमदार, मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली हे ठाकरेंचे उमेदवार असणार आहेत.

राजन तेली यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिवसेनेत आज पाच पक्षप्रवेश झाले आहेत. चांगले कार्यकर्ते, माणसं शिवसेनेत येत आहेत. राजन तेली आमचाच. पण मधल्या काळात त्याची दिशाभूल झाली होती. मात्र, आपण ज्या दिशेत जात आहोत ती आपली दिशा नाही हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे ते स्वगृही आला आहे. राजन जसे आले तसे दिशा बदलून इकडे तिकडे गेलेले ते मोठ्या संख्येने इकडे येत आहेत.'

Rajan Teli join Shivsena UBT
Nagpur Assembly Elections : काँग्रेस आक्रमक होताच दक्षिण नागपूर होल्डवर, ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता

राज्यातील वातावरण बदलायला लागले आहे, असे मी म्हणणार नाही ते बदलले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणणार हे महाराष्ट्रातील जनता ठरवले आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

कोकण आणि शिवसेना हे एकजीव आहेत. शिवसेनेला कोकणापासून आणि कोकणापासून शिवसेनेला कोणी तोडू शकत नाही, ही येणारी निवडणूक दाखवून देईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

दीपक साळुंकेंनी बांधले शिवबंधन

‘मातोश्री’ निवासस्थान येथे दीपकआबा साळुंखे यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मी दीपकआबा साळुंखे यांच्या हातात मशाल दिली आहे. त्यांची धग तुम्हाला दाखवून द्यायची आहे. आपला विजय नक्की आहे, असा विश्वास व्यक्त करत शिवसेना ( यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दीपकआबा साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Rajan Teli join Shivsena UBT
Reservation : SC आरक्षणाबाबत हरियाणा सरकारचा मोठा निर्णय; ‘एनडीए’त वाद उफाळणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com