Chakur Nagar Panchayat News Sarkarnama
मराठवाडा

Chakur Nagar Panchayat News : चाकूरचे नगराध्यक्ष माकणेंच्या मनमानीवर स्वपक्षीयांचाच प्रहार!

Chakur Municipal Council President Kapil Makne resigned before the scheduled no-confidence vote : अखेर 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यात प्रहारच्या नगरसेवकांचाही समावेश आहे.

Jagdish Pansare

Latur District Politics : चाकूर नगर पंचायतीचे अध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर स्वपक्षासह युती असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनीही अविश्वासाचे हत्यार उपसले. 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यावर मतदान होण्याआधीच माकणे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मनमानी कारभार, विश्वासात न घेणे आदी ठपका त्यांच्यावर नगरसेवकांनी ठेवला होता.

प्रहार आणि भाजपा युतीची सत्ता असलेल्या चाकूर नगर पंचायतीतील कारभार गेल्या काही दिवसापासून चांगलाच चर्चेत होता. (Latur) स्वपक्षीय तसेच युती असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनाही माकणे विश्वासात घेत नव्हते. नगर पंचायतीकडून शहरात राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोपही सातत्याने केले जात होते.

प्रहारचे कपिल माकने नगराध्यक्ष तर भाजपचे अरविंद बिरादार उपनगराध्यक्ष म्हणून कारभार पहात होते. सहली, भेटीगाठी, सत्कार सोहळे आणि विकासकामापेक्षा अधिक त्यांचे लक्ष पाणीपुरवठ्यावर अधिक होते, अशी चर्चा होती. (Marathwada) तत्कालीन मंत्री बच्चू कडू, व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 75 कोटीची पाणीपुरवठा योजना चाकूरसाठी मंजूर करून आणली होती. या योजनेची अंमलबजावणी, त्यासाठीच्या ठरावांवर सह्या घेतांना झालेले गैरप्रकार हे मुद्दे त्या काळात बरेच गाजले.

याशिवाय शहरातील विकास कामे, रस्त्यांची झालेली दुरावस्था, बंद पडलेले सौर लाईट, हायमस्ट यावरूनही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्यांची ही जबाबदारी असतांना ते मात्र गप्प होते? असा आरोपही झाला. रस्त्यावर घेतलेल्या बोअरला देण्यात आलेल्या परवानग्या, शहरातील कचरा, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण झाले. उपनगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. तेव्हा त्यांनी राजीनामा देत आपली बाजू सेफ केली.

पण नगराध्यक्ष कपिल माकणे मात्र कोणालाच बधले नाहीत. अखेर 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यात प्रहारच्या नगरसेवकांचाही समावेश आहे. नगराध्यक्ष कपिल मागणे हे आम्हाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असून हे नियमबाह्य पद्धतीने कामकाज चालवतात. विशेष म्हणजे ते लातूरला राहत असल्याने ते या पदासाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे नगरपंचायतच्या दैनंदिन कामकाजात प्रचंड विस्कळीतपणा येत आहे. ते नियमबाह्य पद्धतीने भ्रष्टाचार युक्त कारभार चालवतात. त्यामुळे आम्हा नगरसेवकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे या सगळ्यांचे म्हणणे आहे.

सोमवारी सकाळी अकरा वाजता नगरपंचायत सभागृहात विशेष सभा ठेवण्यात आली होती. त्याआधीच माकणे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यामुळे विशेष सभा रद्द करण्यात आली. नगराध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे चाकूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. आता नवा नगराध्यक्ष कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची यात महत्वाची भूमिका असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT