MLA Suresh Dhas News Sarkarnama
मराठवाडा

MLA Suresh Dhas : कराड-घुलेला झालेली मारहाण हा परळीतील टोळीयुद्धाचा परिणाम!

MLA Suresh Dhas comments on the recent attack in Jail involving Karad and Ghule, attributing it to the ongoing gang conflict in Parli. परळीत ज्या टोळ्या आहेत, त्यांच्या टोळीयुद्धातून ही मारहाण झाल्याचे धस यांनी म्हटले आहे. बीड जिल्हा आणि परळीमध्ये वाल्मीक कराड आणि बबन गीते यांच्यामध्ये प्रचंड वैर आहे, हे नवे नाही, हे सर्वश्रुत आहे.

Jagdish Pansare

Beed News : बीडच्या कारागृहात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाली हे खरं आहे. परळीमध्ये ज्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत त्याचा हा परिणाम आहे. वाल्मीकअण्णा कराड यांनी बबन गीतेंचा एन्ड केल्याशिवाय चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतली आहे. तर बबन गीते यांनी कराडचा एन्ड केल्याशिवाय दाढी काढणार नाही? असा प्रण केला आहे. त्यामुळे जे घडलं ते काही अनपेक्षित नाही, या दोघांच्या टोळीयुद्धाचा हा परिणाम असल्याचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

बीडच्या जेलमध्ये वाल्मीक कराड, (Walmik Karad) सुदर्शन घुले यांना बबन गीतेच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बीडमधील कारागृह देखील सुरक्षित नसल्याची टीका यावरून होत आहे. या संदर्भात आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत या मारहाणीच्या घटनेला दुजोरा दिला.

परळीत ज्या टोळ्या आहेत, त्यांच्या टोळीयुद्धातून ही मारहाण झाल्याचे धस (Suresh Dhas) यांनी म्हटले आहे. बीड जिल्हा आणि परळीमध्ये वाल्मीक कराड आणि बबन गीते यांच्यामध्ये प्रचंड वैर आहे, हे नवे नाही, हे सर्वश्रुत आहे. गोळी घालून सरपंचाची हत्या करण्यात आली होती, या प्रकरणात आम्हाल गोवण्यात आले, असा गीतेच्या लोकांचा आरोप होता. यावरून कराड आणि गीते गँगमध्ये वाद सुरू होते. त्यातून ही मार झालेली असू शकते.

बीड कारागृहात ही मारहाण झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्याचे काही कारण नाही. या कारागृह आणि तेथील पोलीस यंत्रणेवर चार तासांचा चित्रपट तयार होऊ शकतो, अशी टीकाही सुरेश धस यांनी केली. आपण लवकरच कारागृह अधिक्षकांची भेट घेऊन अधिक माहिती घेणार आहोत. पोलीसांना तुरुंगात काहीही घडू शकतो हे माहित असूनही हा प्रकार घडला कसा? याचे आश्चर्य वाटते.

या संदर्भात आपण लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लातूर आणि बीडच्या कारागृहाबद्दल सविस्तर बोलणार आहोत, असेही धस म्हणाले. यापुर्वी कारागृहात कैदी एकमेकांना मारहाण करतात हे चित्रपटातच पहायला मिळत होते. पण बीडच्या कारागृहात हे प्रत्यक्ष दिसले, असा टालोही धस यांनी लगावत पोलीस व कारागृह प्रशासनावर निशाणा साधला. दरम्यान, कारागृह प्रशासनाने मात्र अशी कुठलीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT