Mumbai News: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे. त्यांनी काही दिवसंपासून सातत्यानं कधी आपल्यावर झालेल्या आरोपांवर तर कधी पक्षानं आता नवी जबाबदारी द्यावी याबाबत विधानं करत आहे. अशातच आता त्यांच्याविरोधात त्यांच्या घटस्फोटीत पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे.
करूणा मुंडे धनंजय मुंडेंना खडेबोल सुनावले आहे. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे म्हणाले,मी जो गुन्हा केला नाही, त्याची शिक्षा मला भोगावी लागली. त्यांनी गुन्हा केला नसला, तरी जे गुन्हा करत होते, त्यांना पाठबळ देणारं तुझं मंत्रिपद होतं. तुझ्या मंत्रिपदाच्या जोरावर वाल्मिक कराडसारखे गुंड लोक बीडमध्ये उड्या मारत आहेत, अशा शब्दांत करूणा शर्मा-मुंडे यांनी यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी तुझा हात नसेल. तरी त्यांना पाठबळ देणारा तूच होतास, तुझ्या मंत्रिपदाच्या जोरावर हे लोकं काम करत होते. आज परळीमध्ये नकली दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या आहेत. आणि तू काय म्हणतोस की, माझी चूक नाही, सगळ्यात मोठी चूक तर तुझीच आहे,असा धक्कादायक आरोप करुणा शर्मा यांनी केला.
करुणा शर्मा मुंडे म्हणाल्या, वाल्मीक कराड कोणासाठी काम करत होता? तुझ्या मोठमोठ्या कारखान्यांमध्ये तो होता, जे बिझनेस आहेत, त्या सगळीकडे तो होता. एक घरामध्ये काम करणारा साधारण गुंड, हा साधारण नव्हे तर तुझीच सावली होता,त्यांना मोठं करणारं, तुझं मंत्रिपद होतं असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
आज परळीची अवस्था काय आहे ते मी पाहिलं आहे. जे गुंड झाले त्यांचा दोष नाही त्यांची काय लायकी होती? त्यांची काहीच लायकी नव्हती. वाल्मीकसारख्या लोकांना हाताखाली धरून गुंडांची गँग तयार करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तुझा होता असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. व्हाईट कॉलर बनून मोठं भाषण देत आहेस,पण असं चालू देणार नाही,आता मी आहे, असं आव्हानही करुणा मुंडे यांनी यावेळी धनंजय मुंडे यांना दिलं.
बीडमध्ये आणि परळीमध्ये अजूनही खंडणी गोळा करणे, जमीन हिसकावणे, कला केंद्र, नकली दारू असे सगळे धंदे तुझे कार्यकर्ते करत आहेत. घरात काम करणाऱ्या वाल्मीक कराडची काय लायकी होती? असा सवाल करूणा शर्मानं विचारला.
बीड जिल्ह्याच्या भगवानगडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले होते, मी 250 दिवस शांत होतो.माझी बहीण मला आधार देत होती.माझ्याविरोधात मीडिया ट्रायल सुरू होती.मला एकच सांगायचंय की,माझ्याविरोधात घोटाळे काढले,कोर्टात गेले,कोर्टाने मला क्लीन चिट दिली.जे कोर्टात गेले, त्यांना लाख रुपयांचा दंड बसला.एवढं होऊन देखील मी शिक्षा भोगत आहे,असे वक्तव्य मुंडे यांनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.