Kumbhmela Politics: कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वमालकीच्या जमिनीतील घरांवर फिरला सरकारी बुलडोझर, त्र्यंबकेश्वरला शेतकऱ्यांची काळी दिवाळी!

NMRDA's harassment of farmers for Kumbh Mela, farmers made homeless, farmers in distress in their own land-‘एनएमआरडीए’ च्या एकतर्फी कारवाईने संतप्त शेतकरी रस्त्यावर, सत्ताधारी मंत्री, आमदारही अधिकाऱ्यांपुढे झाले हतबल
Farmers Agitation at trimbakeshwar Road
Farmers Agitation at trimbakeshwar RoadSarkarnama
Published on
Updated on

Kumbhmela News: गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रशासनाने आक्रीत केले. ‘एनएमआरडीए’च्या यंत्रणेने शेतकऱ्यांना त्यांच्याच वडिलोपार्जीत व अनेक वर्षे वास्तव्य असलेल्या जागेतील घरे, दुकाने, गोठे पाडून बेघर केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. त्यातून पहिला वरवंटा त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतच्या खेड्यांमधील शेतकऱ्यांवर फिरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेऊनही काहीही उपयोग झाhttps://www.youtube.com/watch?v=caGtwTinrkcला नाही.

विशेष म्हणजे ‘एनएमआरडीए’ प्रशासनाने या शेतकऱ्यांना सात दिवसांची नोटीस दिली होती. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर आदी नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली. यावेळी दिवाळीत कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Farmers Agitation at trimbakeshwar Road
Mahayuti Politics: 'संकटमोचका'च्या जळगावमध्येच महायुतीला अव्हेरले; एकनाथ शिंदेच्या आमदाराने युतीची चर्चाही फेटाळली!

मात्र प्रशासनाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना त्यांच्याच जागेत निराधार केले. दिवाळीपर्यंत मुदत मिळावी ही विनंती देखील फेटाळण्यात आली. याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांची संपर्क केला. त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

Farmers Agitation at trimbakeshwar Road
Uddhav Thackeray Politics: भाजपचा असाही गेम प्लॅन; पूर्वाश्रमीचे शिवसेना नेत्यांचे परस्परांवरच हल्ले!

शहरात रस्त्याच्या मध्यरेषेवरून साडेबावीस मीटरची मर्यादा आहे. महापालिका हद्दीबाहेर एनएमआरडीएने मात्र चक्क पन्नास आणि ३७ मीटरची मर्यादा केली आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारची वाढीव मर्यादा कशी? असा प्रश्न गोकुळ महाले यांनी केला आहे.

या कारवाईच्या विरोधात परिसरात प्रचंड संताप आहे. शेतकऱ्यांना जबरदस्तीने त्यांच्या स्वतःच्या जमिनीवरील घरांतून बाहेर काढले जात आहे. दुकाने पाडण्यात येत आहेत. स्वतःहून बांधकाम काढण्यासाठी धमकावले जात आहे, अशी तक्रार या भागातील महिला आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्य सरकार लाडकी बहीण असे वारंवार म्हणते. मात्र याच सरकारने ऐन दिवाळीत बहिणींना त्यांच्याच शेतीतून बाहेर काढले आहे. कितीही नोटीस आणि भरपाई मिळण्याबाबत देखील अनिश्चितता आहे.

गेले दोन दिवस शेतकरी गावालगत रस्त्यावर जमतात आणि शासनाच्या विरुद्ध घोषणा देत आंदोलन करतात. संतप्त शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन त्रंबक रस्ता अडवला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. शेकडो वाहने अडकून पडली.

शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी दिवाळी आहे. अतिवृष्टीने शेतकरी आधीच खचला आहे. त्यात त्याची घरे देखील रिकामी करून घेतली जात आहेत. अनेक शेतकरी निराधार बनले आहेत. यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी काळी दिवाळी आहे असे या भागातील संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com