Karuna Mundes Swaraj Shakti Party Contest in Local Body Election News Sarkarnama
मराठवाडा

Karun Munde News : करूणा मुंडेंचा स्वराज्य शक्तीसेना पक्षही 'स्थानिक' निवडणुकीच्या मैदानात

Karuna Mundes Swaraj Shakti sena In Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करूणा मुंडे लातूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाने पाच जागा लढवल्याचे सांगितले.

Jagdish Pansare

  1. करुणा मुंडे यांच्या स्वराज्य शक्तीसेना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला आहे.

  2. या निर्णयामुळे बीड आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

  3. मुंडे कुटुंबातील तणावाच्या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांच्या या हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Latur Political News : गेल्या दीड-दोन वर्षापासून राज्याच्या राजकारणात आपल्या बेधडक आणि बिनधास्त आरोपांनी वादळ निर्माण करणाऱ्या करुणा मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. लातूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या करूणा यांनी वोटचोरीच्या मुद्यावरून परळीत कशा पद्धतीने मतदान केले जाते? हे सांगताना पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत, अशी घोषणा स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी आज लातूरमधून केली. 'वोटचोरी'च्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका अधिक पारदर्शक वातावरणात झाल्या पाहिजेत, यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करूणा मुंडे लातूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाने पाच जागा लढवल्याचे सांगितले. आता पक्षाला दीड वर्ष झाले आहे. आम्ही सातत्याने नवीन मुद्दे मांडत आहोत, पक्षाच्या माध्यमातून नवीन चेहरे पुढे आणत आहोत. त्यामुळे आमच्या पक्षाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सर्वांपेक्षा वेगळी 'वोटचोरी' परळीत

राहुल गांधी यांच्यामुळे 'वोटचोरी'चा मुद्दा गाजत आहे. खरेतर सगळीकडेच 'वोटचोरी' सर्रास सुरू आहे. या प्रकरणात सगळ्यांपेक्षा वेगळे कुठे घडत असेल तर ते परळीत घडत आहे, हे मी स्वत: डोळ्यांनी पाहिलेले आहे. मतदानादिवशी 'लोकांना घरातून बाहेर पडू नका, तुमचे मतदान आम्ही करू' असे सांगितले जाते. मृत व्यक्तीच्या नावावरही तेथे मतदान होते. इतकेच काय डोक्याला बंदूक लावून मतदान घेण्याची तिथे पद्धत आहे, असा आरोप करूणा मुंडे यांनी यावेळी केला.

करूणा मुंडे या सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका आणि गंभीर आरोप करत असतात. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसावरून छगन भुजबळ यांनी विधान केल्यानंतर करूणा यांनी अचानकपणे धनंजय मुंडे यांची बाजू घेतली होती. तेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा परळीतील वोटचोरी संदर्भात आरोप करत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.

FAQs

  1. प्रश्न: करुणा मुंडे यांचा स्वराज्य शक्तीसेना पक्ष कोणत्या निवडणुकीत उतरतो आहे?
    उत्तर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत.

  2. प्रश्न: या निर्णयाचा बीड जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होईल?
    उत्तर: या निर्णयामुळे बीडमध्ये त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे.

  3. प्रश्न: स्वराज्य शक्तीसेना पक्षाचे उद्दिष्ट काय आहे?
    उत्तर: जनतेच्या स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि पारदर्शक नेतृत्व निर्माण करणे.

  4. प्रश्न: करुणा मुंडे यांच्या पक्षाच्या विरोधात कोणती प्रमुख नेते असतील?
    उत्तर: पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या गटाशी थेट स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

  5. प्रश्न: पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे का?
    उत्तर: उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT