Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Attack on Thackeray's Leader: ठाकरेंच्या नेत्यावर चाकू हल्ला! संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीत घडला थरार

Attack on Thackeray's Leader: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीतून हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्योजकांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

Jagdish Pansare

Attack on Thackeray's Leader: हॉटेल बंद करून घरी जात असताना अज्ञातांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुका प्रमुख कृष्णा राठोड यांना अडवून त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकात हा हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीतून हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्योजकांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यातच काल मध्यरात्री कामगार चौकात हॉटेल चालक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या उपतालुकाप्रमुखावर अज्ञातांनी चाकू हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांचा मित्रही जखमी झाला होता.

वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील ही घटना आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेला मित्र मन्नू राठोड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री सुमारे 12 वाजता कामगार चौक परिसरात घडली. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा नोंद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात जय भवानी नावाचे हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून कृष्णा राठोड आणि त्यांचे सहकारी मन्नू राठोड हे चारचाकी वाहनाने घरी जात होते. कामगार चौकात पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीवरून तिघा अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला.

यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. यादरम्यान अज्ञात आरोपींनी कृष्णा राठोड यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मन्नू राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT