राम काळगे
Amit Deshmukh : माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाचा राज्यभर दबदबा होता. शिवाय काँग्रेस पक्षातही त्यांनी पक्षाला व स्वतःला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले होते. जे विलासराव देशमुखांनी करून दाखवले ते त्यांचे पुत्र अमित देशमुख यांना जमेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. Latur Congress News
विलासराव देशमुख यांचे नेतृत्व संपूर्ण राज्याला व देशाला परिचित सर्व मान्य असे होते. मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात कायम राहण्यासारखा आहे. त्यांचे वक्तृत्व, भाषाशैली, पक्षाचे ध्येय, धोरण, विचार लोकांचे मन परिवर्तन करण्यासाठी प्रभावी ठरायचे. Congress Mla Amit Deshmukh
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभा निवडणुकीत तर त्यांच्या 80 ते 90 सभा संपूर्ण महाराष्ट्रभर असायच्या. त्यांच्या सभांना प्रचंड मागणीही होत असत. एकदा विलासराव देशमुख यांची सभा झाली, की तिथल्या काँग्रेस उमेदवाराचा विजय झालाच म्हणून समजा इतका त्यांचा प्रभाव पडायचा. अशातच लातूर लोकसभा असो वा विधानसभा निवडणुका (Election) पहिल्यांदा आपल्या मतदारसंघाची संपूर्ण तयारी करूनच ते महाराष्ट्रभर (Maharashtra) फिरत असत.
आता हेच काम भविष्यात अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना करावे लागणार आहे. पडत्या काळात काँग्रेसला खंबीर साथ देऊन आपल्या कर्तृत्वातून वेगळा ठसा राज्यभर निर्माण करण्यासाठी ही संधी अमित देशमुख यांना राहणार आहे. विभागीय काँग्रेसच्या (Congress) मेळाव्यासाठी संपूर्ण प्रदेश पातळीवरील प्रमुख नेते उपस्थित होते. शिवाय नुकत्याच झालेल्या विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासही मोठ्या प्रमाणात राज्यभरातील काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली होती.
काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांनीही आहे तेथेच भक्कम पणे काम करत राहा, असा सल्ला दिल्याने व राज्यातील काही प्रमुख नेत्यानी अमित देशमुख यांनी राज्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन केल्याने आता अमित देशमुख यांना चांगलेच बळ मिळाले आहे. पूर्वी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पक्षाने दिलेल्या उमेदवारास चांगले मताधिक्य मिळत. अजूनही मोठा वर्ग पक्षाला मानणारा आहे. त्यामुळे आता योग्य नियोजन गरजेचे आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस (Congress) पक्ष सोडून भाजपत प्रवेश केला, यामुळे मराठवाड्यात मोठी पोकळी काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. असे असले तरी आता लातूरबरोबर मराठवाड्याची (Marathawada) जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण लोकनेते विलासराव देशमुख यांचा राजकीय (Political Letest News) वारसा पुढे चालवत आहोत हे दाखवण्याची संधी अमित देशमुख यांच्याकडे आली आहे. जे विलासरावांना जमले ते मुलाल जमेल का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
Edited by : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.