Lok Sabha Election 2024 : लातूर लोकसभा निवडणुकीत लागणार अमित देशमुखांच्या नेतृत्वाचा कस

Amit Deshmukh and Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर मराठवाड्यात आता काँग्रेसकडे बडा नेता नाही. अशावेळी मराठवाड्याची जबाबदारी अमित देशमुखांच्या खांद्यावर येऊ शकते.
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Latur Political News: दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा पुढे नेणारे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडे मराठवाड्यातील काँग्रेसचे नवे, तरुण नेते म्हणून पाहिले जाते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसकडे बडा नेता उरलेला नाही. अशावेळी लातूरच्या गढीकडे राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा कटाक्ष टाकला आहे. (Lok Sabha Election 2024)

निवळी येथील विलासराव देशमुख सहकारी साखर कारखान्यात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी अमित देशमुख यांना बाहेर पडा, महाराष्ट्रात फिरा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास दिला. आता नेत्यांनी लढ म्हटल्यावर अमित देशमुख मैदानात उतरतात का ? हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Deshmukh
Nanded BJP News : भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांना '50 कोटींचे' रिटर्न गिफ्ट...

लातूरच्या आणि मराठवाड्याच्या राजकारणात विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामुळे मोठे बदल घडण्याच्या चर्चेला बळ मिळाले. लातूर लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असावा हे तुम्ही ठरवा, आम्ही दिल्लीत त्या नावाची शिफारस करू, असे सांगत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक प्रकारे लोकसभेचा लातूरमधील उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार अमित देशमुख व त्यांचे काका माजी मंत्री दिलीप देशमुख यांना दिल्याचे स्पष्ट झाले.

कधी काळी लातूर लोकसभा मतदारसंघावर अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या याच मतदारसंघांत गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसला पराभवाचे तोंड पहावे लागत आहे. राज्यातील गेल्या साडेचार पाच वर्षांतील राजकीय घडामोडी पाहता, यंदाची लोकसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट होणार आहे. अशावेळी लातूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्याचे मोठे आव्हान देशमुख काका-पुतण्यासमोर असणार आहे.

अद्याप तरी अमित देशमुख यांनी वरिष्ठांनी दिलेला सल्ला मनावर घेतल्याचे दिसत नाही. मात्र, येणाऱ्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप अंतिम होऊन उमेदवारी जाहीर केली जाईल, त्यानंतर खऱ्या अर्थाने अमित देशमुख यांच्या नेतृत्वाचा कस लातूरसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही लागणार आहे. गेल्या काही लोकसभा निवडणुकांपासून अमित देशमुख यांच्यावर राजकीय सेटलमेंटचे आरोप केले जात आहेत.

स्वतःचा लातूर शहर व बंधू धीरज देशमुख यांचा ग्रामीण मतदारसंघ सेफ करून घेण्यासाठी ते लोकसभेसाठी भाजपशी हात मिळवणी करतात, असे जाहीर आरोप यापूर्वीही झाले आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू असताना दबक्या आवाजात देशमुख बंधूंची नावेही समोर येत होती. परंतु या चर्चेवर काका दिलीपराव देशमुख यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर अमित देशमुख यांच्याकडूनही पूर्णविराम लावण्यात आला आहे.

Amit Deshmukh
Dharashiv Loksabha News: ओमराजे हे तर मोदी कृपेने झालेले खासदार; लोकसभेच्या रिंगणात आणखी एका इच्छुकाची भर

तेव्हा आता अमित देशमुख लातूर जिल्ह्याचे राजकारण सांभाळतानाच मराठवाडा आणि पक्षाला गरज असेल तेव्हा राज्याच्या राजकारणातही आपली ठोस भूमिका वटवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी त्यांच्या राजकीय नेतृत्वाची परीक्षा लातूर लोकसभा मतदारसंघाच्या विजयातून होणार आहे.

अमित देशमुख यांनी लातूर लोकसभा पुन्हा जिंकण्याचा विश्वास राज्यातील नेत्यांसमोर बोलून दाखवला होता. आता तो प्रत्यक्षात पूर्ण करण्याची वेळ आली आहे. या नेतृत्वाच्या परीक्षेत अमित देशमुख खरे उतरतात का ? याकडे राज्याच्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Amit Deshmukh
Prakash Ambedkar : भाजपचा खोटारडेपणा ओळखलेला बरा; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com