CA Shyam Kalani arrest  Sarkarnama
मराठवाडा

Latur fraud case : बेकायदेशीरपणे तब्बल 2 हजार कोटी परदेशात पाठवले; पोलिसांकडून उदगीरच्या सीएला अटक

Latur Forex Case : छत्रपती संभाजीनगर येथील उपआयकर संचालक दीपक कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jagdish Pansare

Marathwada News : बेकायदा कागदपत्रांच्या आधारे २ हजार १४३ कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा गंभीर प्रकार लातूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात मदत करणाऱ्या उदगीर येथील सीए श्याम कलानी याला अटक करण्यात आली आहे. परकीय चलनाच्या व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म 15 सीबी प्रमाणपत्रांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका कलानी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

प्रकरणातील १८१० अर्ज संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. आयकर विभागाच्या पथकाने १८ ऑगस्ट रोजी कलानी याच्या उदगीर येथील कार्यालयावर छापा टाकत कागदपत्रांची तपासणी केली होती. यातून २०२२-२३ आणि २०२५-२६ या कालावधीत प्रदेशात निधी पाठवण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कोणत्याही वैध कागदपत्रांची पडताळणी न करताच जारी करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

या प्रमाणपत्राद्वारे संबंधित घटकांना अनुचित आर्थिक लाभ मिळवून देण्यासोबतच देशाच्या परकीय चलन साठ्याला मोठा फटका बसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रमाणपत्राद्वारे संबंधित घटकांना अनुसूचित आर्थिक लाभ मिळवून देण्यासोबतच देशाच्या परकीय चलन साठ्याला मोठा फटका बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या व्यवहारातून तब्बल २ हजार १४३ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा संशय आहे. यामध्ये काही मध्यस्थ आणि मुख्य सूत्रधारांचा सहभाग यात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असून छत्रपती संभाजीनगर येथील उपआयकर संचालक दीपक कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर हे प्रकरण लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासण्यासाठी सोपवण्यात आले होते. लातूर आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या पथकाने श्याम कलानी याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील संशयास्पद व्यवहार प्रमाणपत्रांची निर्मिती आणि निधी परदेशात पाठवण्यामागील इतर धागेदोरे आर्थिक गुन्हे शाखा तपासात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT