Marathvada news : गैर मार्गाने बोगस कंपन्या दाखवून हजारो कोटी विदेशात पाठवल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला उदगीरचा सीए श्याम कलानी याची नऊ दिवसांसाठी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 15 सीबी प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल 2143 कोटी रुपये बेकायदेशीररित्या विदेशात पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आयकर विभागाच्या तपासणीतून समोर आला होता.
याप्रकरणी सीए श्याम कलानी याला अटक करण्यात आली होती. सोमवारी उदगीर न्यायालयात कलानी याला हजर करण्यात आले. मूळच्या कर्नाटकातील खेरडा येथील रहिवासी असलेला कलानी 2021 मध्ये सीए झाला होता. त्याचा आणखी एक भाऊ पुण्यात सीए असल्याची माहिती आहे. न्यायालयाने कलानी याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार तर्फे एडवोकेट के.टी उगलमुगले यांनी न्यायालयात काम पाहिले. कलानी यास न्यायालयात हजर केले तेव्हा कोर्टात त्याची पत्नी आई-वडील व इतर नातेवाईक हजर होते या सर्वांना पाहून तो भावूक झाला होता.
भारतातून कोट्यावधी रुपये परदेशात पाठवण्यासाठी बोगस कंपन्या स्थापन करून त्याद्वारे हा पैसा फिरवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. 'दिव्य मराठी'च्या वृत्तानुसार 2143 कोटी रुपये गैर मार्गाने देशाबाहेर पाठवल्या प्रकरणात अटकेत असलेला सीए श्याम कलानी हा एकमेव नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार देशभरातील असे सात सीए आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून उदगीर पाठोपाठ इतर ठिकाणीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कलानीच्या मदतीने 16 कंपन्यांमार्फत सिंगापूर, मलेशिया, अमेरिका अशा देशांमध्ये रक्कम वळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या 16 कंपन्यांना कोट्यावधी रुपये प्रदेशात पाठवण्यासाठी सीए श्याम कलानी याने १५ बी प्रमाणपत्र तयार करून दिले ते प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट गायब असल्याची माहिती आता समोर आली आहे.
प्रार्थमिक तपासानुसार तीन कंपन्यांच्या मार्फत 743 कोटी रुपये विदेशात पाठवण्यात आले होते. परंतु या तीनही कंपन्या बोगस असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर 13 कंपन्यांचे पत्तेही बोगस निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व कंपन्यांकडून पाठवण्यात आलेल्या परदेशातील रकमांची माहिती व पडताळणी तपास यंत्रणांकडून केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.