NCP News Jalna Sarkarnama
मराठवाडा

NCP News : जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न! छावाच्या जिल्हाध्यक्षासह चार जणांवर गुन्हा दाखल

Tensions rise in Jalna as miscreants throw a petrol bottle at the NCP office in response to a recent incident in Latur. Police investigation is underway. : राधेश्याम पवळ याने पेट्रोलच्या बाटलीला आग लावून राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या शटरवर फेकली. त्यामुळे या पेट्रोलच्या बाटलीचा भडका उडाला. त्यानंतर हे सर्वजण तेथून निघून गेले.

Jagdish Pansare

Jalna Political News : लातूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद जालन्यात उमटले. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.20) मध्यरात्री राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलच्या बाटली पेटवून त्या कार्यालयाच्या शटरवर फेकण्यात आल्या. या प्रकरणी छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

कृषीमंत्री विधान परिषदेमध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याचा निषेध म्हणून छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेत पत्ते उधळून निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष (NCP) कार्यालयावर रविवारी मध्यरात्री छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप तागडे, राधेश्याम पवळ व इतर तीन जणांनी जात घोषणाबाजी केली आणि शिव्याही दिल्या.

राधेश्याम पवळ याने पेट्रोलच्या बाटलीला आग लावून राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या शटरवर फेकली. त्यामुळे या पेट्रोलच्या बाटलीचा भडका उडाला. (Jalna) त्यानंतर हे सर्वजण तेथून निघून गेले. दरम्यान या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात संभाजी भुतेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावा संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक व कदीम जालना पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेत झालेल्या राड्यानंतर राज्यभरात छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवेदन देताना छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सुनील तटकरे यांच्या टेबलवर पत्ते भिरकावले होते. निवेदन देऊन बाहेर जात असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली.

या घटनेनंतर रात्री लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर फाडण्यात आले. या घटनेचे पडसाद काल रात्री उशिरा जालना शहरातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर पेट्रोलच्या बाटल्या फेकून ते जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पेट्रोलने भरलेली बाटली फेकून आग लावण्याच्या प्रयत्नात कार्यालयाचे शटरचे नुकसान झाले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांचे वाहन चालक संभाजी भुतेकर यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ताडगे, राधेश्याम पवळ यांच्यासह इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली.

यावरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पक्षाच्या कार्यालयात कामाला असताना रविवारी रात्री अकरा वाजता चार-पाच जण आले आणि त्यांनी आरडाओरड करत शिवीगाळ केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नावाने घोषणा आणि शिवीगाळ करत कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांना कार्यालयाच्या सिक्युरिटी गार्ड पांडुरंग पडूळ यांनी आणि मी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पेट्रोलने अर्धवट भरलेली बाटली पेटवून ती कार्यालयावर फेकून हल्लेखोर पसार झाले. यात कार्यालयाच्या शटरची किरकोळ नुकसान झाले,असे भुतेकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT