Suraj Chavan: 'मारकुट्या' सूरज चव्हाणला 24 तासांच्या आतच दोन मोठे दणके; अजित पवारांच्या आदेशानंतर आता पोलिसांनी कठोर पावलं उचलली

Ajit pawar ncp leader suraj chavan : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला. यानंतर आता सूरज चव्हाणला 24 तासांच्या आतच दोन मोठे दणके पडले आहेत.
Ajit Pawar and suraj chavan .jpg
Ajit Pawar and suraj chavan .jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

1.रम्मी प्रकरणाने राजकारणात खळबळ: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनात मोबाईलवर रम्मी खेळताना आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला, त्यावर 'छावा' संघटनेने निषेध व्यक्त केला.

2.सूरज चव्हाणकडून मारहाण, त्यानंतर संताप: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ‘छावा’ कार्यकर्त्यांवर हात उगावल्यानंतर राजकीय वातावरण तापले; विरोधकांचा तीव्र टीका सुरू.

3.अजित पवारांचा कारवाईचा आदेश आणि चव्हाण यांचा राजीनामा: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना तात्काळ राजीनाम्याचे आदेश दिले असून, पोलिसांनी चव्हाण व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News : महायुती सरकारमधील कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर अखिल भारतीय ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले.

या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला. यानंतर आता सूरज चव्हाणला 24 तासांच्या आतच दोन मोठे दणके पडले आहेत. (Within 24 hours, NCP youth leader Suraj Chavan faces a double setback—Ajit Pawar orders his resignation and Latur police deploy two teams for his arrest following a viral assault video)

राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला. तसेच विरोधकांनीही महायुती सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे या कृत्याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी(ता.21) लातूर बंदची हाक दिली आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit Pawar) सूरज चव्हाण यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. तर लातूर शहरातील विवेकानंद पोलिसांनीही आता सूरज चव्हाण यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Ajit Pawar and suraj chavan .jpg
Suraj Chavan : 'छावा'च्या प्रदेशाध्यांना मारहाणीचे सूरज चव्हाणांनी दुसरेच कारण सांगितले; म्हणाले, 'सुसंस्कृत नेत्याचा वारसा...'

लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक अशी दोन पथके सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. मारहाणीच्या घटनेनंतर अखिल भारतीय ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाणांना अटक होत नाही, तोवर आंदोलनावर ठाम राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.यामुळे लातूर शहरात तणावाचं वातावरण आहे.

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी ट्विट करत सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Ajit Pawar and suraj chavan .jpg
Parliament Monsoon Session 2025: मोदी Vs इंडिया आघाडी: 'या' मुद्दांवरुन संसदेच्या अधिवेशनात जुंपणार

सूरज चव्हाणांची जाहीर दिलगिरी

याचदरम्यान, लातूरमध्ये रविवारी घडलेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर सर्वच स्तरांतून टीका होत असताना सूरज चव्हाण यांनी सोमवारी(ता.21) सकाळी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत घटनेविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते व्हिडिओमध्ये म्हणाले, कालच्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कोकाटेंचे कृषिमंत्रिपदही धोक्यात

कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयी केलेल्या एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्यानंतर आता अधिवेशनावेळी सभागृहात रमी खेळत असल्याच्या त्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे वादात सापडले आहेत. कोकाटेंचे कृषिमंत्रिपदही धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Ajit Pawar and suraj chavan .jpg
Satara Politics: अधिवेशनात सातारी ‘बाणा’; देसाईंची ‘बॅटिंग’; पहिल्यांदाच मंत्री झालेले तिघेही अग्रेसर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी धाराशिव येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकाटेंबाबत तीव्र नाराजी व्यक्त व्यक्त करतानाच पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असे सूचक विधान केलं आहे.

1. प्रश्न: माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकारामुळे वादात सापडले?
उत्तर: अधिवेशनात मोबाईलवर रम्मी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.

2. प्रश्न: सूरज चव्हाण यांनी नेमकं काय केलं?
उत्तर: 'छावा' कार्यकर्त्यांवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.

3. प्रश्न: अजित पवारांनी सूरज चव्हाण यांच्याबाबत काय निर्णय घेतला?
उत्तर: त्यांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितलं.

4. प्रश्न: या प्रकरणानंतर पोलिसांनी काय कारवाई केली?
उत्तर: सूरज चव्हाण व 12 जणांवर गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com