Latur Khandapur scam : लातूर जिल्ह्यातील खंडापूर इथं जगद्गुरू तुकोबाराय यांचा 375व्या वैकुंठगमन सोहळ्याचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं. यात कीर्तनकार किशोर शिवणीकर महाराज यानं सप्ताहातील सुमारे दीड कोटी रूपयांसह पलायन केल्याचं समोर आल्यानं वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे.
संबंधित कीर्तनकाराकडे एक रिव्हॉल्व्हर असल्याचे देखील सांगितलं जात आहे. सध्या या प्रकार सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवणीकर महाराज अद्याप समोर आलेला नसून, कायदेशीर कारवाईची मागणी केली जात आहे.
याची दखल घेत, छोटे माऊली म्हणून ओळखतात, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लातूर (Latur) इथले शिवणीकर महाराजांनी धोका दिल्याचा आरोप केला. शिवणीकर महाराज या आरोपांवर काय बोलतात, याकडे लक्ष लागलं आहे. छोटी माऊली यांच्या नेतृत्वात यापूर्वी सप्ताह झाले असून, ते अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपाचे होते.
विंचूर जवळील भरवस फाट्याजवळ मागील काही महिन्यांपूर्वी, असाच भव्य-दिव्य स्वरूपाचा सप्ताह भरला होता. मात्र तो देखील वादग्रस्त ठरला. या सप्ताहाचे नेतृत्व स्वतःला छोटे माऊली यांनी केलं. वारकऱ्यांच्या (Warkari) विश्वासाचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात माया जमवणारा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करणे, म्हणजे संतांच्या विचाराला हरताळ फासण्यासारखे असल्याची टीका होऊ लागली आहे.
या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करून, त्यांना अटक करण्याची मागणी त्र्यंबकेश्वर इथले संत निवृत्तीनाथ समाधी संस्थांनचे विश्वस्त डॉ. अमर ठोंबरे यांनी केली आहे. छोटी माऊली जो हिशोब देत आहेत, त्यापेक्षा प्रत्यक्ष खर्च मात्र जास्त दाखवला गेला आहे. शिवणीकर महाराज जो पैसे घेऊन पळालेला आहे, त्यापेक्षा आणखी काही वेगळे आहे, असा संशयही डाॅ. अमर ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्या करतो आहे अन् दुसरी कोट्यवधी रूपयांचे सप्ताह आयोजित केले जात आहे. हे सर्व विसंगत असून, असे कोट्यवधींचे सप्ताह बंद करून काही विधायक कामांसाठी उपाययोजना कराव्यात, असे डाॅ. अमर ठोंबरे यांनी सुनावलं आहे.
भक्ती-भावापोटी अनेक वारकरी, काही सामान्य लोक पैसे देतात, त्यामागे संतांची पुण्याई आहे, संतांवरील श्रद्धा आहे. मात्र वारकरी संप्रदायाचे स्वतः धुरीण समजतात, ते कुठेतरी या लोकांची फसवणूक करून कोट्यवधींची माया जमवत आहे, या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी डॉ. अमर ठोंबरे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.