Sudhakar Shingare Sarkarnama
मराठवाडा

Latur Loksabha Constituency : राम मंदिर, ट्रिपल तलाक, कलम 370चा साक्षीदार होता आले, याचा आनंद..

Sudhakar Shingare : सव्वापाचशे वर्षापासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावला. एवढेच नाही तर सीएए सारखा कायदा लागू करून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगला देशातील हिंदूना या दशाचे नारिकत्व, त्यांना शरण देण्याचा निर्णय घेतला.

Jagdish Pansare

Latur Lok Sabha Constituency : गेल्या लोकसभा निवडणुकीत लातूरकरांनी मला खासदार म्हणून दिल्लीत निवडून पाठवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने अनेक जुलमी कायदे रद्द केले. काश्मीरमधील कलम 370 हटवले, मुस्लिम माता-भगिनींना ट्रिपल तलाक सारख्या जाचक गोष्टीतून मुक्त केलं. सव्वापाचशे वर्षापासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावला. एवढेच नाही तर सीएए सारखा कायदा लागू करून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगला देशातील हिंदूना या दशाचे नारिकत्व, त्यांना शरण देण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जे काँग्रेसच्या साठ वर्षाच्या काळात घडलं नाही, ते मोदींजीनी करून दाखवलं. एक खासदार म्हणून मला या सगळ्या ऐतिहासिक गोष्टींचा साक्षीदार होता आलं, याचा आनंद असल्याची भावना लोकसभेच्या लातूर मतदारंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी व्यक्त केलं आहे. या देशाच्या विकासासाठी, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मला मत द्या, माझे मत थेट मोदींना जाणार आहे, असे आवाहनही श्रृंगारे यांनी केले.

मा‍झ्या कार्यकाळात लातूर मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन झाले, जिल्ह्यात हजारो कोटींचे रस्ते झाले. निलंग्यात रेल्वे आणण्याचे जे स्वप्न माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी पाहिले आहे, ते येणाऱ्या काळात मी पूर्ण करीन, अशा शब्द देतो. निलंग्यात रेल्वे आल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही, अशा प्रण निलंगेकरांनी घेतला आहे.

दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी स्वतः संभाजी निलंगेकरांना सोबत घेऊन जाईल आणि रेल्वे मंत्रालयाकडून निलंग्याच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी आणीन, असा विश्वासही श्रृंगारे यांनी व्यक्त केला. गेल्या निवडणुकीत मला उमेदवारी मिळावी यासाठी संभाजी निलंगेकर यांनी प्रयत्न केले.

यावेळीही त्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी मला उमेदवारी मिळवून दिली. पाच वर्षात जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली आहेत, या पुढील काळात प्रलंबित कामे आपल्याला करायची आहेत. केंद्र सरकारने जेव्हा संसदेत सीएए, तीन तलाक, कलम 370, महिलांना 33 टक्के आरक्षणाचे बील आणले, तेव्हा 262 क्रमांक म्हणून मला मतदान करता आले, या सगळ्यांचा साक्षीदार होता आले.

भविष्यात महिला आरक्षणामुळे खासदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून संसंदेची नवी इमारत बांधण्यात आली आहे. जेव्हा महिलांना 33 'टक्के आरक्षण लागू होईल, तेव्हा व्यासपाठीवर बसलेल्या अनेक माझ्या भगिनी संसदेत खासदार म्हणून दिसतील, असा विश्वास श्रृंगारे यांनी व्यक्त करतांनाच येणाऱ्या 7 तारखेला मला मतरुपी आशिर्वाद देऊन विजयी करा, असे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT