Karuna Munde News : करुणा मुंडेंचं बाँडवरच शपथपत्र; आयुष्यभर खासदारकीचे वेतन अन् पेन्शन जनतेला...

Loksabha Election 2024 : 'मी खासदार पदावर असताना कोणतीही मालमत्ता स्वत:च्या नावावर करणार नाही...'
Karuna Munde News
Karuna Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीडची लोकसभा निवडणुक हायव्होल्टेज होत आहे. भाजपच्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane), वंचितचे अशोक हिंगे यांच्यासह 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रत्येकजण मतदारांना वेगवेगळी आश्वासने देत आहे. लोकसभेच्या रिंगणात असलेल्या करुणा मुंडे यांनी तर बाँडवरच शपथपत्राद्वारे आश्वासन दिले आहे.

खासदार म्हणून मिळणारे वेतन आणि पेन्शन आपण आयुष्यभर जनतेला देणार आहोत. खासदाराच्या घरी बनणाऱ्या चहापासून ते वाहनाच्या पेट्रोलचा खर्च देखील सरकार करते. त्यामुळे आपल्याला पैशाची गरज नाही. फक्त जनतेच्या सेवेसाठी आपण लोकसभा निवडणुक लढवित असल्याचे त्यांनी 100 रुपयांच्या बाँडवर प्रसिद्ध केले आहे. बीडच्या विकास आणि बदलासाठी संधी मागणाऱ्या करुणा मुंडे यांनी मी खासदार पदावर असताना कोणतीही मालमत्ता स्वत:च्या नावावर करणार नाही, असेही म्हटले आहे.

Karuna Munde News
Raosaheb Danve News : अशाही नणंद-भावजय; रावसाहेब दानवेंची लेक अन् सून यांचा एकत्रित प्रचार...

बीड लोकसभा मतदार संघातून भाजपने खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना रिंगणात उतरविले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे निवडणुक लढवित आहेत. वंचितने अशोक हिंगे यांना उमेदवारी दिली आहे. बसपाचे सिद्धार्थ टाकणकर असे 41 उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपा महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीत मतदारांना भावनिक साद घातली आहे. मुंडे म्हणाल्या, पाच वर्ष मंत्री म्हणून काम केले. पराभवानंतरही जनतेची सेवा केली. जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी अगोदर पायाभूत सोयी केल्या. रेल्वे आली, महामार्ग झाले आता उद्योगही आणता येतील. मला जिल्हा दुष्काळमुक्त करायचंय. त्यासाठी विजयी करा, असं मुंडे म्हणाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

करुणा मुंडे (Karuna Munde) या देखील स्वराज्य शक्ती सेनेकडून बीड लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांना हिरा हे चिन्ह भेटले आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून रेल्वे, रस्ते, पाणी आदी आदी विकासांच्या मुद्द्यांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी आणि आश्वासने देणे सुरु आहे. यात करुणा मुंडे यांनी मात्र आपण खासदार म्हणून मिळणारे वेतन आणि पेन्शन जनतेला देणार असल्याचे चक्क १०० रुपयांच्या बाँडवर लिहून दिले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Karuna Munde News
Lok Sabha Election News : ऐन लोकसभा निवडणुकीत सरकारचा मोठा निर्णय; 'डीप फेक' केल्यास...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com