Amit Deshmukh News :  Sarkarnama
मराठवाडा

Latur Lok Sabha Constituency : कोणाचा पक्ष असली अन् कोणाचा नकली, याचा फैसला जनतेच्या न्यायालयात..

राम काळगे

Latur Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी महायुतीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाचा उल्लेख भाजपचे नेते नकली पक्ष असा करतांना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील आपल्या प्रचार सभांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे.

असली-नकली पक्षाच्या वादात उडी घेत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी उडी घेत महायुतीच्या नेत्यांना सुनावले आहे. कोणाचा पक्ष असली आणि कोणाचा नकली हे आता जनतेच्या न्यायालयात ठरेल, असे सांगत अमित देशमुख यांनी महायुतीवर टीका केली. भाजपाकडून उध्दव बाळासाहेब ठाकरेचा (Shivsena) पक्ष फोडला, जेष्ठ नेते शरद पवार (NCP) यांचाही पक्ष व घर फोडले वर त्यांनाच नकली असल्याचे हे भाजपावाले सांगत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे असली कोण अन् नकली कोण? हे आता लोकांच्या न्यायालयात ठरणार आहे. हे न्यायालय याबाबतचा फैसला सात मे रोजी करणार असून नकली कोण, असली कोण? हे एकदा दाखवून द्याच, असे अवाहन अमित देशमुख यांनी निलंगा येथील जाहीर सभेत केले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, उमेदवार डॉ. शिवाजी काळगे (Shivaji Kalge) आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार हे निलंग्याचे भुमिपुत्र आहेत ही संधी दवडू नका ते निलंग्याचे उमेदवार आहेत. एकच सुत्र खासदार होणार भुमिपूत्र, निलंग्याच्या पाठीशी लातूर भक्कमपणे उभा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीनी बाजार मांडलाय, त्यांनी मतदारांची किंमत केली नाही. उद्धव ठाकरेचा (Uddhav Thackeray) पक्ष फोडला, शरद पवारांचे (Sharad Pawar) घर फोडलं ही लढाई असली अन् नकलीची आहे. आता तुम्हीच सांगा खरी शिवसेना कोणाची अन् खरा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा, हे सगळे नकली आहेत, असा टोला अमित देशमुख यांनी महायुतीला लगावला

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तर ठरवेलच कोण असली कोण नकली? मात्र खरे कोण हे आता जनतेच्या लोकन्यायालयातच होणार आहे. आता खरे कोण? हे ठरवावेच लागेल, ती संधी मतदानाच्या रुपाने तुम्हाला आली आहे. या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, मालाला भाव नाही, शेतकरी हैराण आहे. महीला सुरक्षित नाहीत, शिकलेल्या तरुणांच्या हाताला काम नाही, अशी दयनीय अवस्था आहे.

त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीने (MVA) महिलांच्या सुरक्षिततेची गॅरंटी घेतांनाच त्यांच्या खात्यात दरवर्षी एक लाख जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. सुशिक्षित बेकारांना विद्यावेतन, जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. या देशाला सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी परिवर्तन आवश्यक असल्याचे आवाहन अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केले. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे पाप हे सरकार करत आहे.

जिसकी जितनी संख्या भारी उतणी उसकी भागीदारी, असे सुत्र आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी व पारदर्शक कारभारासाठी काँग्रेसला मतदान करा. महाराष्ट्रात ४० जागा तर मराठवाड्यातील आठ जागा महाविकास आघाडीच्याच निवडून येणार असल्याचा दावा करतानाच हा देश संविधानामुळे टिकून आहे, यापुढे सविंधानाचे रक्षण करा, असे आवाहनही देशमुख यांनी आपल्या भाषणात केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT