Loksabha Election 2024 : फिरोज गांधींपासून सुरु झालेली रायबरेलीच्या विजयाची कौटुंबिक परंपरा राहुल जपणार?

Soniya Gandhi रायबरेलीशी गांधी घराण्याची असलेले नाते कायम राहिले असले तरी अमेठीशी असलेले नाते मात्र तूर्त तुटले आहे. १९९९ च्या निवडणुकीत सोनिया गांधी आणि २००४ पासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत राहुल गांधी हेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.
Feroz Gandhi, Indira Gandhi, Soniya Gandhi, Rahul Gandhi
Feroze Gandhi, Indira Gandhi, Soniya Gandhi, Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

Raebareli Loksabha News : काँग्रेसने राहुल गांधी यांची रायबरेलीतून उमेदवारी जाहीर केल्यामुळे गांधी घराण्याचे या मतदारसंघाशी असलेले नाते कायम राहिले आहे. देशातील पहिल्या दोन लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राहुल गांधी यांचे आजोबा आणि इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी विजयी झाले होते. फिरोज गांधी यांच्यामुळे रायबरेली आणि गांधी-नेहरू घराण्याचे नाते सर्वप्रथम जोडले गेले होते.

फिरोज गांधी यांचे १९६० मध्ये निधन झाल्यानंतर आर. पी. सिंह आणि बैजनाथ कुरील या दोन काँग्रेस नेत्यांनी सात वर्षे मतदारसंघाची धुरा सांभाळली आणि १९६७ नंतर इंदिरा गांधी यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व करत येथील जनतेशी आपल्या कुटुंबाचे असलेले नाते आणखी घट्ट केले. इंदिरा गांधी यांनी १९८० मध्ये रायबरेलीबरोबरच आंध्र प्रदेशातील मेडक (सध्या तेलंगणात) मतदारसंघातूनही निवडणूक लढविली होती. दोन्ही ठिकाणी विजय झाल्यावर त्यांनी रायबरेलीतून राजीनामा दिला होता.

त्यावेळी नेहरू घराण्यातीलच अरुण नेहरू यांनी या मतदारसंघांचे नेतृत्व केले होते. त्यांच्यानंतर शीला कौल या येथून निवडून आल्या होत्या. त्या इंदिरा गांधी यांच्या मामी होत्या. शीला कौल यांनी १९८९ आणि १९९१ च्या निवडणुकीत रायबरेलीतून विजय मिळविला. १९७७ नंतर १९९६ ला प्रथमच हा मतदारसंघ काँग्रेसेतर पक्षाकडे (भाजप) गेला. १९९९ मध्ये मात्र पुन्हा काँग्रेसचे नेते सतीश शर्मा यांनी हा मतदारसंघ पक्षाकडे परत आणला.

Feroz Gandhi, Indira Gandhi, Soniya Gandhi, Rahul Gandhi
Priyanka Gandhi News : प्रियांका गांधींसाठी असा आहे काँग्रेसचा प्लॅन; पण राहुल जिंकले तरच...

या काळापर्यंत सोनिया गांधींनी काँग्रेसवर आणि भारतीय राजकारणातील आपले स्थान पक्के केले होते. १९९९ मध्ये राजीव गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतून त्यांनी विजय मिळवत आपली क्षमताही सिद्ध केली होती. मात्र, २००४ मध्ये राहुल गांधी यांच्या राजकारण प्रवेशासाठी त्यांनी अमेठी ऐवजी रायबरेलीची निवड केली. २००४ पासून ते २०१९ पर्यंत रायबरेलीच्या जनतेने त्यांना पाठिंबा दिला आहे. सोनिया गांधी आता राज्यसभेवर गेल्या असल्याने त्यांची जागा आता राहुल गांधी यांनी घेतली आहे. आपल्या घराण्याचा हा परंपरागत मतदारसंघ ते टिकवितात की नाही, हे चार जूनला समजेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमेठीत २५ वर्षांनंतर ‘गांधी’ नाही

रायबरेलीशी गांधी घराण्याची असलेले नाते कायम राहिले असले तरी अमेठीशी असलेले नाते मात्र तूर्त तुटले आहे. १९९९ च्या निवडणुकीत सोनिया गांधी आणि २००४ पासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत राहुल गांधी हेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. २०१९ च्या निवडणुकीतही राहुल गांधीच रिंगणात होते. यंदाच्या निवडणुकीतही त्यांच्या उमेदवारीची शक्यता असताना काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले आहे. मागील दोन निवडणुकीत राहुल गांधी यांच्या प्रचाराची धुरा किशोरीलाल शर्मा यांच्याच खांद्यावर होती. त्यामुळे यंदा २५ वर्षांनंतर प्रथमच अमेठीच्या निवडणुकीत गांधी घराणे नसेल.

Edited By : Umesh Bambare

Feroz Gandhi, Indira Gandhi, Soniya Gandhi, Rahul Gandhi
Rahul Gandhi News : राहुल गांधींची पुण्यात मोठी घोषणा; आमचं सरकार आल्यावर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com