Vandana Chavan News : फडणवीसांची प्रतिमा खलनायकी, तोडफोडीला मतदार कंटाळले: खासदार चव्हाणांनी डागली तोफ!

Vandana Chavan on Devendra Fadnavis : पक्ष फुटीचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांनी वर्तविला आहे.
Vandana Chavan
Vandana ChavanSarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या देशात वाहत आहेत. सगळ्यात पक्षांनी प्रचार सभांचा चांगलाच धडाका लावला आहे. यातच मागील काही काळात झालेल्या महाराष्ट्रातील सत्ताबदलांमुळे आणि पक्ष फुटीमुळे मतदारांमध्ये संभ्रम अवस्था दिसून येत आहे. याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांनी वर्तविला आहे.

राज्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या तोडाफोडीच्या राजकारणामुळे तसेच भष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देणे, सत्तेचा गैरवापर करणे यामुळे भाजप पक्षाने केलेली महायुती मतदारांना ना पसंत ठरली आहे. भाजपच्या पक्ष फोडीच्या राजकारणाला मतदार कंटाळले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता खलनायकाच्या भूमिकेत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वंदना चव्हाणांना (vandana Chavan) लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्यांभोवती प्रचार सुरू आहे असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, ठराविक उद्योगांनाच मिळणारी सवलत, गैरव्यवहार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळणे, कृषी उत्पादनांवर घालण्यात आलेली निर्यात बंदी, घसरता ह्युमन डेव्हलोपमेंट इंडेक्स नागरिकांसाठी हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

सामान्य कुटुंबाचे अर्थकारण सध्या महागाईमुळे बदलले आहे. बेराजगारी, नोकरीचे प्रश्न यामुळे तरूण वर्गात नाराजीचा सूर आहे. अयोध्येत राम मंदिर झाले, ही चांगली बाब आहे. परंतु हा काही विकासाचा आणि निवडणुकीचा (Loksabha Election) मुद्दा होऊ शकत नाही शेवटी नागरिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजपकडून करण्यात येणारा प्रचाराचे मुद्दे म्हणजे कलम 370 हटविले तसेच ‘एनआरसी’ची अंमलबजावणी केली, या मुद्द्यांना नागरिकांचा विरोध आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीला की महाविकास आघाडीला कोणाला सर्वाधिक जागा मिळतील?

या प्रश्नावर चव्हाण म्हणाल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मतदारांचा वाढता प्रतिसाद आहे. आमच्या पक्षाचे नेते शरद पवार तसेच उबाठा शिवसेनेचे (Shivsena) नेत्यांचे आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभांना मिळणाऱ्या प्रतिसादाने आमचा हुरूप वाढला आहे.

रोज चित्र बदलत असून ते आमच्यासाठी आशादायी आहे. भाजपाच्या (BJP) पक्ष फोटीच्या राजकारणाला मतदार कंटाळले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल नागरिकांच्या मनात नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. त्याचा फटका महायुतीला निश्चित बसेल. महायुतीपेक्षा निश्चितच जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील. Fadnavis's image is bad, voters are tired says MP Vandana Chavan.

Vandana Chavan
Onion Export News : केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात बंदी मागे, पण...

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष व्यक्तिगत झाला आहे का?

महाराष्ट्रात आत्ता पर्यंत राजकारण्यांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी ते व्यक्तिगत स्तरावर कधीही मतभेद नव्हते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांत भाजपामुळे (BJP) राजकारणाचा स्तरच घसरला आहे. त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आंदोलने केली, चौकशांचा सपाटा लावल्या त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करण्याची वेळ भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फोडून त्यांनी राजकारणाचा खेळ मांडला आहे. पवार साहेबांवर रोज बेफाम आरोप होत आहेत. पण मतदारांमध्ये पवार साहेबांप्रती प्रचंड आदर आणि प्रेम आहे. आमची भिस्त मतदारांवर आहे. मतदात्यांना सगळ्या बाजू समजतात. शरद पवारांनी कधीही स्तर सोडून प्रचार केलेला नाही. त्यांच्या समाजाभिमुख भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

तापमानामुळे मतदानाची टक्केवारी कमी होईल, अशी भीती सगळ्याच राजकीय पक्षांना वाटत आहे ?

देश वाचविणे भाजपाच्या तावडीतून वाचवणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे. कारण सत्तेच्या गैरवापर करत राज्यघटनाच बदलण्यासाठी भाजप पुढे सरसावत आहे. देशात सुरू असलेली हुकूमशाही नागरिकांना समजत आहे. त्यामुळे सरकारमधील सत्ताधाऱ्यांबद्दल जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. आता समाजातील सृजन जनता ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, अशी अपेक्षा आहे. Voting percentage will decrease due to temperature?

Vandana Chavan
Priyanka Gandhi News : प्रियांका गांधींसाठी असा आहे काँग्रेसचा प्लॅन; पण राहुल जिंकले तरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com