Amit Deshmukh News: मराठवाड्यातील अनेक दिग्गज काँग्रेस (Congress) नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी लोकसभा निवडणुकीवर याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तिथेच असून, आता त्यांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाचा जनतेला वीट आला असून, आता एक वेगळी लाट निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केला आहे.
काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkar) यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. ऐन निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर काँग्रेस नेत्याच्या घरातच फूट पडल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी मात्र काँग्रेसमधून कोणीही इतर पक्षात गेले, तरीही त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लातूर लोकसभा मतदारसंघात (Latur Lok Sabha Constituency) स्वतः आपणच उमेदवार आहोत ही भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे ही जागा आम्ही नक्कीच खेचून आणू, असा विश्वासही देशमुख (Dr. Shivaji Kalge) यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी राज्यातील वस्तुस्थितीवर भाष्य केले. तसेच केवळ भाषणे देऊन चालणार नाही, तर गावागावांतील मतदान केंद्रातून आपल्याच उमेदवाराला सर्वाधिक मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काळगे यांच्या रूपाने निष्कलंक, चरित्रसंपन्न, उच्चविद्याविभूषित लोकांच्या कामाला येणारा उमेदवार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत:च उमेदवार असल्याचे समजून प्रचार कार्यात सक्रिय व्हावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
देशातील पुरोगामी विचाराचे पक्ष इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत, तर राज्यात महाविकास आघाडी (MVA) लोकसभेची निवडणूक लढवत आहे. काँग्रेसचे लातूर लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत, अनेक दशके त्यांनी लातूरमध्ये रुग्णसेवा केली आहे. या उमेदवाराला मतदारापर्यंत घेऊन जाणे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
दिल्लीचे कायदेमंडळ कायदे करण्यासाठी आहे, तिथे काळगे यांना आपल्याला पाठवायचे आहे. विरोधी उमेदवारापेक्षा आमचे उमेदवार सरस आहेत. लोकसभेत विद्यमान खासदारांनी किती प्रश्न मांडले हे आपणाला माहिती आहे. काळगे निवडून आल्यावर संसदेत राज्यातील, मराठवाड्यातील, तसेच लातूरमधील प्रश्न मांडून लातूरकरांना न्याय देतील. आता लातूरकरांना ही सुवर्णसंधी आहे, ती अजिताबात डावलू नका, असे आवाहन करतानाच देशमुख यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्यावर टीकाही केली.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.