Lok Sabha Election: अंबादास दानवेंशी थेट संपर्क झाला नाही पण..., रावसाहेब दानवेंचं सूचक वक्तव्य

Sambhajinagar Lok Sabha Election: महायुतीत काही जागांवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही आले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अंबादास दानवे यांच्या संदर्भात सूचक वक्तव्य केलं.
Ambadas Danve, Raosaheb Danve
Ambadas Danve, Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election: शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चा काही केल्या थाबंत नाहीत. मला ऑफरसाठी रोज फोन येत आहेत, मी खैरेंचे नाही शिवसेनेचे (Shivsena) काम करणार, अशी विधाने करत दानवे यांनी आपल्याभोवतीच्या संशयाला हवाच दिली. या संधीचा पुरेपूर फायदा उचलण्याचे प्रयत्न आता भाजपकडूनही सुरू झाले आहेत.

महायुतीत काही जागांवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत भाजपच्या (BJP) नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही आले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच होते, असे सूचक वक्तव्य केलं. तसेच त्यांच्याशी आमचा थेट संपर्क झालेला नाही. ते आज आमच्यासोबत नाहीत ते त्यांचे काम करतात, अशी गुगलीही त्यांनी या वेळी टाकली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या चार तारखेला राज्यात मोठा धक्का बसणार, असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला. मला जालन्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे, याशिवाय मराठवाड्यातील काही जागा जाहीर झाल्या आहेत, तर काही जागांबाबत चर्चा सुरू आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी आलो होतो. चार तारखेला मोठा धक्का बसणार, असा दावा महायुतीकडून केला जातोय. त्यामुळे मराठवाड्यातील हा नेता असणार का? या प्रश्नावर आमच्या विचाराचा नेता असेल तर त्याला आमच्या पक्षात आणण्याचे काम आम्ही करत असतो, असे सांगत दानवेंनी सस्पेन्स कायम ठेवला.

Ambadas Danve, Raosaheb Danve
Marathwada UBT News : मतदारसंघ सांभाळून खैरे-जाधव- ओमराजेंना करावा लागणार पक्षाचा प्रचार...

दरम्यान, अंबादास दानवे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल विचारले असता, "अंबादास दानवे पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत, ते आज आमच्यात नाहीत ते त्यांचे काम करतात, आमचा त्यांच्याशी थेट संपर्क झालेले नाही," असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी सूचक इशाराही दिला. संभाजीनगरची (Sambhajinagar) जागा आम्हाला मिळावी, अशी आमची इच्छा आहे. परंतु ती मित्रपक्षाला जरी मिळाली तरी ती जिंकण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत, असेही दानवेंनी सांगितलं. त्यामुळे संभाजीनगरची जागा भाजपने शिंदे गटाला सोडली का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Ambadas Danve, Raosaheb Danve
Latur Congress News : काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश; फडणवीसांची घेतली भेट

ठाकरे गट आणि काँग्रेस (Congress) हे एका विचाराचे नाहीत, ते एकत्र येत निवडणूक लढवूच शकत नाहीत. त्या तिघांचे तोंड तीन वेगवेगळ्या दिशांना आहेत. ते एकत्र दिसत असले तरी तसे स्थानिक पातळीवर कुठेच दिसून येत नाही. त्यांना निवडणुकीत यश मिळाले तरीही ते एक राहणार नाहीत, त्यांचा वाद जुना आहे, अशी टीकाही दानवे यांनी केली. आजही आमची संभाजीनगरची सीट वन वेच आहे आणि कोणी मदतीला धावून येणार असेल तर त्याला आम्ही तयार आहोत, आमच्यात जागांचा वाद राहिलेला नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com