Manohar Gomare  Sarkarnama
मराठवाडा

Latur Commissioner Suicide Attempt : मोठी बातमी! आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लातूर महापालिकेच्या आयुक्तांना उपचारासाठी मुंबईला हलवले

Latur Commissioner Shifted to Mumbai: पुढील उपचारासाठी लातूर येथील हॉस्पिटल ते विमानतळ येथे ग्रीन कॉरिडर करण्यात आला होता. त्यानंतर एअर ॲम्बुलन्सद्वारे त्यांना मुंबईला हलविण्यात आले. पुढील उपचार त्यांच्यावर मुंबई येथील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे होणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Latur Government Officer News: लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री उशिरा स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला 40 तासाहून अधिकाचा काळ उलटला आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर ऑपरेशन करण्यात आल्याने आता त्यांची तब्येत स्थिर आहे. मात्र, आता पुढील उपचारासाठी लातूर येथील हॉस्पिटल ते विमानतळ येथे ग्रीन कॉरिडर करण्यात आला होता. त्यानंतर एअर ॲम्बुलन्सद्वारे त्यांना मुंबईला हलविण्यात आले. पुढील उपचार त्यांच्यावर मुंबई येथील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे होणार आहेत.

लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यात ते बचावले. त्यानंतर सोमवारी मनोहरे यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

सोमवारी (7 एप्रिलला) साडेदहा ते अकराच्या दरम्यान एअर ॲम्बुलन्सद्वारे मनोहरे यांना लातूर विमानतळावरून मुंबईकडे नेण्यात आले. मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामधून ते बचावले आहेत.

शनिवारी रात्री त्यांना तातडीने उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी गोळी झाडल्यानंतर कवटीचे हाड मेंदूत अडकले होते. त्यावर लातूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र मेंदूच्या काही भागात संवेदना कमी आहेत.

त्यासाठी पुढील उपचार करण्यासाठी बाबासाहेब मनोहरे यांना मुंबई येथील कोकिळा बेन हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हनुमंत किनीकर यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे.

लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल (Hospital) ते लातूर विमानतळ दरम्यान ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. त्यानंतर लातूर विमानतळावरून एअर ॲम्बुलन्सद्वारे मनोहरे यांना मुंबईकडे नेण्यात आले. लातूर येथील हॉस्पिटलमध्ये मनोहरे यांच्यावर काही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्टल, रिकामी बुलेट, दोन मोबाईल व काही कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरु आहे. त्यामुळे या मागचे नेमके कारण हे अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी मात्र पोलिसांकडून किंवा त्यांच्या कुटुंबांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT