Deenanath Mangeshkar Hospital : भाजप पदाधिकारी मंगेशकर रुग्णालयाच्या संचालक बाॅडीवर! मुरलीधर मोहोळांनी दिलं स्पष्टीकरण

Union Minister Murlidhar Mohol MP Sanjay Raut Deenanath Mangeshkar Hospital Pune : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलच्या संचालक बाॅडीवर भाजप पदाधिकारी असल्याच्या खासदार संजय राऊत यांच्या आरोपाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलं.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं वेळेत उपचार न केल्याने एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे.

ही घटना समोर आल्यानंतर सर्व स्तरातून घटनेचा निषेध होतोय. राजकीय, सामाजिक संघटनांकडून या घटनेवरून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलनं करण्यात येत आहे.

याप्रकरणाची राज्य सरकारने देखील दखल घेत चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालक मंडळावर भाजप पदाधिकारी असल्याने कोणतीही कारवाई होणार नाही, असा आरोप केला आहे.

Murlidhar Mohol
Devendra Fadnavis : पुण्यात पाऊल ठेवताच सीएम फडणवीसांनी आंदोलकांना ठणकावले; म्हणाले, 'आता बस झालं....'

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोपाला भाजप केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मोहोळ म्हणाले, "संजय राऊत यांना माध्यमांचे बूम दिसले की, उठसुट काहीही बोलतात. या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे. घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून त्या कुटुंबासोबत आम्ही सगळे आहोत".

Murlidhar Mohol
Deenanath Hospital Controversy : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे सत्य आजच येणार समोर, चौकशी समितीचा अहवाल तयार!

समाजातील प्रत्येक स्तरांमधून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असल्याने मुख्यमंत्र्यांनी या घटनेचे चौकशीचा आदेश तातडीने दिला आहे. घडलेली घटना ही चुकीची असून ज्या व्यक्तीची अथवा संस्थेची चुकी असेल त्याच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. दुर्दैवी घटना झाली अशाच पद्धतीची घटना पुन्हा घडू नये याची देखील काळजी घेण्यात येईल, असेही मोहोळ यांनी म्हटले.

वक्फ बोर्ड कायदा आणि हिंदुत्व याचा काही संबंध नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यावर मुरलीधर मोहळ म्हणाले, वक्फ जमिनी ठराविक लोकांच्या ताब्यात होत्या. मात्र या जमिनी गरिबांच्या मुलांच्या शिक्षण, सामाजिक कामासाठी असतात. या जागांचा गैरवापर सुरू होता. आता या कायद्यामुळे या जमिनी गोरगरिब मुस्लिमांसाठी वापर होईल, असं मुरलीधर मोहळ यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com