
Pune News : पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून महिलेला ऍडमिट करून घेण्यापूर्वी दहा लाख रुपयांचा ऍडव्हान्स मागण्यात आले. मात्र तो ऍडव्हान्स भरण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या महिलेवर उपचार करण्यास नाकार दिला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. घटनेचा गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने देखील या संदर्भात आरोग्य विभागाची एक चौकशी समिती गठित केली आहे. ही चौकशी समिती संबंधित घटनेबाबत अहवाल तयार करत असून पुढील दोन दिवसांमध्ये हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अहवालानंतरच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिले आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मात्र चौकशी समितीने हा अहवाल सादर करण्यापूर्वीच या चौकशी समितीवर मनसेने आक्षेप घेतला आहे.
मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी या चौकशी समितीचे अध्यक्ष असलेले राधाकिशन पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राधाकिशन पवार यांच्यावर आर्थिक घोटाळ्यातून कोट्यावधी रुपये लाटल्याचे आरोप करण्यात आला आहे. अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला समितीचा अध्यक्षपदावर ठेवू नये, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बोरकर यांनी केली आहे.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिशा भिसे या गर्भवती भगिनीस बाळांतपणा दरम्यान उपचार न मिळाल्याने या भगिनीचा दिनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे बळी गेलेला आहे. यानंतर दिनानाथ रुग्णालय प्रशासनावर राज्य शासनाने चौकशी समिती नेमलेली आहे. या चौकशी समितीचे अध्यक्ष आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकिशन पवार हे आहेत.
राधाकिशन पवार या दोषी व्यक्तीने दोषी असलेल्या धर्मादाय दिनानाथ रुग्णालय प्रशासनाची चौकशी करू नये. राधाकिशन पवार यांच्यावर अनेक वेळा त्यांच्या शासकीय कामात कोट्यावधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याबाबत त्यांच्यावर विभानसभेत आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत विधानसभेतही लक्षवेधी घेऊन फक्त चर्चाच झालेली आहे. राधाकिसन पवार हे दोषी असूनही त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई अपेक्षित असताना, ही व्यक्ती दिनानाथ रुग्णालयाची काय चौकशी करणार असेल तर या चौकशीतून सत्य बाहेर पडेल यात शंका वाटते. असं या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.