Maharashtra Cabinet Expansion MLA Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Cabinet Expansion: 'तुम्ही निवडून द्या, संभाजी पाटलांना मंत्री करु' ; पक्षश्रेष्ठींनी शब्द फिरवला! कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Maharashtra Cabinet Expansion MLA Sambhaji Patil Nilangekar: संभाजी पाटील यांना कॅबिनेटमंत्री म्हणून संधी मिळाली नसल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याचा फटका स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राम काळगे

Nilanga : निलंगा विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेले माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी आहे. निवडणूक काळात राष्ट्रीय पातळीवरील महायुतीच्या नेत्यांनी मंत्री करतो म्हणून दिलेले आश्वासन म्हणजे...बोलाचाच भात बोलाचीच कडी....असे असते... याची प्रचिती मतदारसंघातील नागरिकांना आली आहे.

निवडणूक प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यांनी उपस्थित मतदारांना तुम्ही निवडून द्या संभाजीरावांना मंत्री करतो अशी आश्वासन मतदारसंघातील जनतेला दिले होते. परंतु त्यांचा कोणता नाईलाज झाला असावा, असा सवाल कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये भाजप महायुतीला भरघोस यश मिळूनही भाजपला मंत्रीपद न दिल्यामुळे संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. याबाबतचे नेतृत्व नेमके कोणाकडे द्यायची हे पक्षश्रेष्ठीसमोर आव्हान असणार आहे.

निलंगा मतदारसंघ हा राजकीयदृष्या संवेदनशील मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला काँग्रेस कधी भाजपाकडून सतत राज्याच्या सत्तेमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री कै.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अनेक वर्षी या भागाचे नेतृत्व मंत्रिमंडळात केले आहे. शिवाय त्यांनी विविध खात्याचा पदभार सांभाळून या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्यानंतर संभाजीराव पाटील यांनीही नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चौथ्यांदा विजय प्राप्त केला आहे.

राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव निश्चित मानले जात होते. यापूर्वी राजकीय घडामोडीनंतर झालेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या विस्तारामध्ये सुद्धा त्यांना संधी देण्यात आली नव्हती उलट लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांना संधी देण्यात आली.

लातूर शहराची जागा वगळता एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळाले आहे. शिवाय मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये सत्ता मिळवण्यात संभाजी पाटील यांचा मोठा वाटा होता.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. परंतु राज्यांमध्ये मिळालेल्या भरघोस यशामुळे व लातूर जिल्ह्यातील भाजपला बळकट करण्यासाठी संभाजी पाटील यांना निश्चित कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळेल, असे अपेक्षा होती शिवाय ज्येष्ठ आमदार असल्यामुळे नव्याने होणाऱ्या विस्तारात संभाजी पाटील यांनी निलंगेकर यांची वर्णी लागणार म्हणून शेकडो कार्यकर्ते नागपूर येथे आपले नाव पक्के आहे म्हणून उपस्थित होते. परंतु मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. लातूर जिल्ह्यात भाजप मोठा पक्ष असताना या पक्षाला संधी न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्याची भविष्यात मोठी गोची होणार आहे.

भाजपा पक्षश्रेष्ठी हा प्रश्न कसा हताळणार याकडे लक्ष लागले. शिवाय राष्ट्रीय नेते व राज्यपातळीवरील नेत्यांनी निवडणुकी दरम्यान मंत्री करतो म्हणून दिलेले आश्वासन हवेतच विरले असून अशी आश्वासन केवळ निवडणुकीत निवडून येण्यापूरते दिली जातात, त्यानंतर फरसे गांभीर्य घेतले जात नाही, याची प्रचिती मतदारसंघातील जनतेला मात्र यानिमित्ताने आली आहे. दिलेले आश्वासन म्हणजे 'बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी,' हे यावरून स्पष्ट झाले आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT