
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटीमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्रित येतील अशा चर्चांना उधाण आले आहे. अशातच ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर आरोप करताना एक खळबळजनक दावा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा रविवार विस्तार झाला. त्यामुळे सध्या भाजपचे 21 शिंदेंच्या सेनेचे 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार मंत्री झाले आहेत. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना डावलण्यात आल्याने हे नेते उघड नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. याबाबत त्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले,"अजित पवारांनी छगन भुजबळांवर अन्याय केला आहे. छगन भुजबळ व गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद नाकारलं हा ओबीसींचा अपमान आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना डावलल्याचं कारण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अथवा आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात घ्यायचं असेल त्यामुळेच भुजबळ यांना डावलण्यात आलं असल्याचा खळबळजनक दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
ओबीसीच आरक्षण टिकवणं महत्त्वाचं आहे. ओबीसीच्या संदर्भातील अनेक प्रश्न समोर असताना भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे अत्यंत चुकीचे आहे. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा अर्धा काळ स्वतःकडे ठेवला असावा आणि अर्धा काळ छगन भुजबळ यांना देणारं असावेत, त्यामुळे मी त्यांच्याकडून आशावादी आहे. अजितदादा मनाने फार मोठे आहेत त्यामुळे काही काळानंतर उपमुख्यमंत्रीपद ते छगन भुजबळ यांना देतील," असं हाके म्हणाले.
हाके म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी लवकरच भेट घेऊन ओबीसीच्या मागण्या संदर्भात चर्चा करणार आहे. ठामपणे महायुतीच्या बाजूने ओबीसी उभा राहिला. सामाजिक न्यायासाठी ओबीसीचा आरक्षण टिकलं पाहिजे. बोगस ओबीसीच्या नोंदी रद्द केल्या पाहिजेत. पंचायत राज मधील ओबीसींचा आरक्षण टिकलं पाहिजे. अशा मागण्या देखील यावेळी हाके यांनी केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.