Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Nilanga Politics News : सरकार आपले तरी लातूरला पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; निलंगेकरांनी रणशिंग फुंकले

Latur Water Issue : महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंगा विधानसभा मतदारसंघात जाणूनबुजून निधी देण्यात आला नाही.

राम काळगे

Nilanga News : यंदा पाऊस अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण लातूर जिल्ह्यात जलसाक्षरता रॅली काढली होती. त्याद्वारे पाणी वापराबाबत जनजागृती करण्यात आली. लातूर जिल्ह्याला शेती आणि उद्योगांसाठी पाणी मिळावे, अशी मागणी सरकार दरबारी केली आहे.

याबाबत सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. सरकार आपले असले तरी पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. (Latur will not rest until it gets water: MLA Sambhaji Patil Nilangekar)

विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यात विविध गावांत विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पणाचा धडाका सुरू आहे. या वेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, यंदा पाऊस अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गणेशोत्सवाच्या काळात जलसाक्षरता रॅलीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याला शेतीसाठी व उद्योगांसाठी पाणी कसे मिळेल, यासाठी सरकार दरबारी मागणी केली आहे. त्याबाबत सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.

सरकार आपले असले तरी जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही; तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. पण पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

विकासनिधीच्या कारणावरूनही आमदार निलंगेकर यांनी राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंगा विधानसभा मतदारसंघात जाणूनबुजून निधी देण्यात आला नाही. आता राज्यात महायुतीचे सरकार आहे. हे सरकार निलंग्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, महावितरणचे शिवशंकर सावळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता बोरफळे, कुमोद लोभे, दगडू सोळुंके, शेषेराव ममाळे, गुंडेराव जाधव आदी उपस्थित होते.

पुलाच्या दुरुस्तीसाठी ७५ लाख मंजूर

दोन तालुक्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर बाकली-बसपूर मांजरा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीसाठी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन आमदार निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पुलाचा भाग खचला आहे. दोन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने येथे मोठी वर्दळ असते, त्यामुळे या पुलाच्या कामासाठी ७५ लाख रुपये निधी आमदार निलंगेकर यांनी मंजूर करवून घेतला. त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT