Pasha Patel News : धनंजय मुंडेंकडून गुरुदक्षिणा : बोलून दाखवलं ते करून दाखवलं ! कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल

Agricultural Value Commission : गोपीनाथ मुंडेंच्या सच्चा मित्राला पुन्हा या पदावर संधी देण्यात आली आहे.
Agricultural Value Commission News
Agricultural Value Commission NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : भाजपचे नेते, माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पाशा पटेल यांच्यावर पुन्हा एकदा कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही निवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी केली आहे. या नियुक्तीसाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला आहे.

पाशा पटेल आणि धनंजय मुंडे यांचे असलेले गुरू -शिष्याचे नाते जगजाहीर आहे. या नात्याबाबत मुंडेंनी औसा (जि. लातूर) येथे एका भाषणात या नात्याविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर लगेचच पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडेंच्या सच्चा मित्राला पुन्हा या पदावर संधी देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Agricultural Value Commission News
Shiv Sena MLA Disqualification : विधान परिषदेतील तीन आमदारांना अपात्र करा; ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार

यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पाशा पटेल यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षपद भूषविले आहे. पाशा पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पटेल यांचे शेतकरी चळवळीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना पहिल्यांदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून २०१७ मध्ये नियुक्त करण्यात आले होते.

रोखठोक स्वभावाप्रमाणे अनेकदा ते अडचणीत

राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा, ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा, यासाठी राज्य सरकारने राज्य शेतमाल भाव समितीचे रूपांतर करून राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन केला आहे.

या आयोगावर पुन्हा एकदा पटेल यांची वर्णी लागली आहे. पटेल यांची ही नियुक्ती मानद स्वरूपाची आहे. सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत ती अमलात राहील, असे निर्णयात नमूद केले आहे. शेतकरी चळवळीतील बंडखोर नेता म्हणून पाशा पटेल यांची ओळख आहे. रोखठोक स्वभावाप्रमाणे अनेकदा ते अडचणीत आले आहेत.

Agricultural Value Commission News
Pasha Patel News : धनंजय मुंडेंकडून गुरुदक्षिणा : बोलून दाखवलं ते करून दाखवलं ! कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com