BJP-NCP Alliance News : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अखेर भाजपच्या उषा तळेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दयानंद सुरवसे यांना संधी देण्यात आली. दोन दिवसापुर्वी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुंबईतील पन्हाळगड या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीतच या नावांवर सहमती झाली होती. परंतु नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपाचे (BJP) जिल्ह्यातील दोन तुल्यबळ नेते आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समर्थकांमध्ये तीव्र स्पर्धा होती. परंतु संभाजी पाटील निंलगेकर समर्थक उषा तळेकर यांनी बाजी मारली. लातूर जिल्ह्यातील भाजपा नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण आणि अंतर्गत गटबाजी याचा फटका महापालिका निवडणुकीत पक्षाला बसला.
जिल्हा परिषदेतही याची पुनरावृत्ती होऊन शतप्रतिशत सत्तेचे भाजपाचे स्वप्न भंगले. 18 जागा जिंकत भाजप महायुतीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि आता अध्यक्षपदही त्यांनाच मिळाले. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून सर्वसाधारण महिला उमेदवार नसणे हे ही भाजपाच्या पथ्यावर पडले.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. त्यात भाजपकडून औसा तालुक्यातील लोदगा गटातून पुनम मुक्ता, देवणी तालुक्यातील वंलाडीतून उषा पाटील तर निलंगा तालुक्यातील सरवडी गटातून कविता गोरे व रेणापूर तालुक्यातील खरोळा गटातून शिवकन्या गोडभरले यांची नावे प्रामुख्याने पुढे आली होती. यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर समर्थक उषा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. परंतु हे नाव शेवटपर्यंत जाहीर न करण्याचे ठरले होते. अखेर सोमवारी त्यांची बिनविरोध निवड झाली आणि लातूर जिल्हा परिषदेला नवा कारभारी मिळाला.
जिल्हा परिषद निवडणुकीत 18 जागी विजयी ठरलेल्या भाजपला अध्यक्ष पद, तर 12 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपाध्यक्ष पद असा फाॅर्म्युला ठरला होता. त्यानूसार सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दयानंद सुरवसे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.