

Supriya Sule : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 23 एप्रिलाल मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन महायुतीमधील नेते करत आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी या पोटनिवडणुकीविषयी मोठी घोषणा केली आहे.
'सुनेत्रावहिंनीच्या विरोधात उमेदवार देणार नाही. महाविकास आघाडी बारामतीची सीट लढणार नाही. प्रश्नच नाही.', खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच महाविकास आघाडीची देखील बारामती पोटनिवडणूकीत उमेदवार देण्याची मानसिकता नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
बारामतीमध्ये महाविकास आघाडी आपला उमेदवार देणार नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिने पहिले पाऊल पडल्याची चर्चा आहे. दरम्यान, निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, 'ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं..!'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.