Yashwant Thorat Case : वारकरी संप्रदाय हादरला! कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड; मुलीचं चार वर्षे शोषण, अमानुष छळ, चटके देत अत्याचार

Kirtankar and president of Shri Durgadevi Warkari Shikshan Sanstha in Parner, Yashwant Thorat, has been remanded to custody by the court after allegations of sexually abusing a minor girl for four years surfaced : पारनेरमधील वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष तथा कीर्तनकार यशवंत थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराजाने चार वर्षांपासून अल्पवयीन मुलीचं शाररीक शोषण करत होता.
Yashwant Thorat Case
Yashwant Thorat CaseSarkarnama
Published on
Updated on

Parner Minor Girl Abuse Case : राज्यातील वारकरी संप्रदायला हादरवणारी घटना पारनेरमधून समोर आली आहे. पारनेर इथल्या श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराजने चार वर्षांपासून अल्पवयीन मुलीचं शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अत्याचार करताना थोरात हा अल्पवयीन मुलीचा अमानुष छळ करायचा, तिला चटके द्यायचा, मुलीनं कोणाला काही सांगू नये म्हणून तिच्यावर पाळत ठेवायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा, या शोषणामुळे पीडिताने घरच्यांना ही माहिती दिली. यशवंत थोरात याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे.

कीर्तनकार यशवंत थोरात आणि पीडिताचे कुटुंब पारनेरमध्ये (Parner) शेजारी राहतो. दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन कीर्तनकार थोरातने 2021 पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा घरी कोणी नसताना थोरात मुलीवर वारंवार तिच्यावर बळजबरी करत अत्याचार करायचा.

ज्या ज्या वेळी पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच याबाबत जर कोणाला काही सांगितले तर, तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन, अशी दमबाजी थोरात मुलीला करायचा. या भीती पोटी व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ चार वर्षे मुकाट्याने सहन केला.

Yashwant Thorat Case
Beed crime news : बीडच्या गुन्हेगारीनं राज्याला पुन्हा हादरवलं! विवाहितेला घरातून उचललं, अत्याचारानंतर गावच्या चावडीवर बांधलं

दरम्यान, चार दिवसापूर्वी 10 मार्चला कीर्तनकार थोरात याने अत्याचारचा कळस गाठला. थोरात याने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. मात्र तिने येण्यास नकार दिला असता, त्याने तिला कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेली पीडिता कीर्तनकार थोरात याच्या घरी गेली, त्याच्या घरी गेली असता, तिला कीर्तनकार थोरातने जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, या कीर्तनकार थोरातने लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेला चटके दिले. यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

Yashwant Thorat Case
Sangamner Teacher Arrest : शाळेतच घडला संतापजनक प्रकार! शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, विद्यार्थिनी गर्भवती, आरोपीला ठोकल्या बेड्या

पीडिताने कुटुंबियांना शोषणाची माहिती दिली

​मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले. त्यानंतर 14 मार्चला पीडितेचा भाऊ घरी आला असता, तिची अवस्था पाहून त्याने तिला विश्वासात घेतले असता, मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने चार वर्षांपासून सुरू असलेल्या शोषणाची माहिती सांगितली. यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

कीर्तनकार थोराताची रवानी कोठडीत

पारनेर पोलिसांनी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पाॅस्को ) सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कीर्तनकार थोरात याला पारनेर न्यायालयात 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक निरीक्षक रणजित मारग तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com