Ambadas Danve On Chandrakant Kahire News :  Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : दानवे खैरेंकडे पाहत म्हणाले, 'साहेबांनी माझं पद काढण्याचा खूप प्रयत्न केला पण...'

Chetan Zadpe

Chhatrapati Sambhajinag News : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा निडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खैरे यांच्यात मोठे राजकीय नाट्य घडून आले. आता मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा दानवे-खैरे यांच्यातल्या सुप्त संघर्ष सुरूच असल्याचे चित्र दानवे यांच्या ताज्या वक्तव्यातून दिसून येत आहे. (Latest Marathi News)

महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी या ठिकाणी खैरे यांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. एका जाहीर प्रचार सभेत खैरे यांच्या उपस्थितीत दानवे मंचावरून भाषण करताना म्हणाले, "मला काही जण म्हणत होते की, मागच्या चार वर्षांत अंबादास दानवे कुठे गेले? पण मी संघटनेचं काम स्थानिक पातळीवर करत होतो. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यानंतरचा या जिल्ह्याचा क्रमांक दोनचा नेता व्हायचा एवढीच माझी इच्छा होती. दुसरी काही अपेक्षा नव्हती माझी. खैरेसाहेब एक नंबर याबाबत वादच नाही. पण दटून थांबावं लागतं. तिकीट नाही मिळालं तरी पक्षाचं काम करावं लागतं. बाकी जास्त काही बोलत नाही, असे दानवे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खैरेंनी माझं पद काढण्याचा प्रयत्न केला -

मी उद्धवसाहेबांना (Uddhav Thackeray) सांगितलं की, मला विरोधी पक्षनेता पद द्यायचं तर द्या, पण मी जिल्हाप्रमुख पद सोडणार नाही. कारण मी संघटनेवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. चंद्रकांत खैरेंनी खूप प्रयत्न केले माझं जिल्हाप्रमुख पद काढायचं. पण उद्धवसाहेबांनी ते नाही काढलं. आता आमदार झाला काढा, नेता झाला काढा, पण मी जिल्हाप्रमुख पदावरून निघणार नव्हतोच, असे दानवे म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT