Narendra Modi News : पंतप्रधानांच्या सभेची तारीख ठरली; 29 एप्रिलला पुण्यात होणार सभा !

BJP leaders have resolved to win B for Baramati in this Lok Sabha election : या लोकसभा निवडणुकीत बी फॉर बारामती जिंकण्याचा संकल्प भाजपच्या नेत्यांनी केला आहे..
Narendra Modi News : पंतप्रधानांच्या सभेची तारीख ठरली; 29 एप्रिलला पुण्यात होणार सभा !

Pune News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे, अशा मतदारसंघात आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या पुणे शहरासह बारामती, शिरूर, मावळ या चार लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत.

महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या चार मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या 29 एप्रिलला ही सभा होणार आहे. शहराचा मध्यवर्ती भाग अशी ओळख असलेल्या स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा घेतली जाणार आहे. यासाठीची तयारी आता भारतीय जनता पक्षासह महायुतीत सहभागी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीतदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरच ही सभा झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi News : पंतप्रधानांच्या सभेची तारीख ठरली; 29 एप्रिलला पुण्यात होणार सभा !
Supriya Sule News : 'भ्रष्टाचाराचा आरोप झाला एक जण भाजपत गेला', सुप्रिया सुळेंनी केली पोलखोल

राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. बहुतांश सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या नेत्यांचे रोड शो, जाहीर सभा यांचे आयोजन केले जात आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी टाकली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर या दोन मतदारसंघातील लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवित आहेत. तर शिरूर मधून खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

दहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर सत्तेतदेखील सहभागी होत अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. महायुतीत सहभागी झालेल्या अजितदादांनी बारामती (Baramati) लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा ध्यास केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात घेण्यासाठी प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केले जात होते. पुण्यात सभा घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

Narendra Modi News : पंतप्रधानांच्या सभेची तारीख ठरली; 29 एप्रिलला पुण्यात होणार सभा !
MP Amol Kolhe Property News : खासदार अमोल कोल्हे आहेत कर्जदार; संपत्तीत झाली दुपटीने वाढ !

गेल्या पंचवार्षिकमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती जिंकण्याचा संकल्प सोडला होता. त्या निवडणुकीत अमेठी जिंकण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. मात्र, बी फॉर बारामतीचे स्वप्न भाजपचे पूर्ण झाले नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला अशी ओळख बारामतीची आहे. आतापर्यंत या मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचे वर्चस्व राहिलेले आहे.

यंदाच्या वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकाविण्याची तयारी गेल्या काही महिन्यांपासूनच भाजपने सुरू केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह इतर काही नेत्यांनीदेखील बारामतीचे दौरे केले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उतरविण्याची खेळी भाजपने केली असली तरी बारामतीमध्ये शरद पवार यांचे पारडे जड होऊ शकते. याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे मोदी यांच्या सभेसाठी हट्ट धरला जात होता.

Narendra Modi News : पंतप्रधानांच्या सभेची तारीख ठरली; 29 एप्रिलला पुण्यात होणार सभा !
Ravindra Dhangekar: पुण्यासाठी आघाडीची फिल्डिंग, धंगेकरांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची हजेरी

बारामतीमध्ये मोदींची सभा झालीच नाही

दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी निवडणूक लढविली होती. जानकर यांनी सुळे यांना कडवी लढत दिली होती. त्यावेळीदेखील बारामती लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु ही सभा झालीच नाही. त्यानंतर 2019 मध्ये पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची जाहीर सभा झाली होती. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या खडकवासला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याचे नियोजन केले जात होते. मात्र, हे शक्य नसल्याने स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा घेतली जाणार आहे.

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com