Raosaheb Danve, Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंना दगाफटका झाल्यास भाजप आमदारांचेही भवितव्य धोक्यात?

Jagdish Pansare

Jalna Lok Sabha Constituency : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve News) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे (kalyan Kale) यांच्या लोकसभेच्या जालना मतदारसंघात झालेल्या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एकतर्फी वाटणारी जालन्याची लढत चुरसीची झाली आणि राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांचे पेव फुटले. भाजपच्या हमखास निवडून येणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या विजयी षटकाराबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात समाजमध्ये असलेली संतापाची लाट मतपेटीच्या रुपातून उमटल्याचे बोलले जाते. त्याचा फायदा थेट कल्याण काळे यांना झाल्याची चर्चा आहे. 13  मे रोजी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कल्याण काळे यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानायला सुरूवात केली आहे. (Jalna Constituency News)

जालना लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) यंदा रेकॉर्डब्रेक असे 70 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात उत्साहात सरासरी 65 ते 70 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. जालना मतदारसंघात महायुतीचा वरचष्मा राहिला आहे. सहापैकी जालना विधानसभा मतदारसंघ सोडला तर तीन भाजप आणि दोन शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भोकरदन-जाफराबाद मधील संतोष दानवे, बदनापूर-नारायण कुचे तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व हरिभाऊ बागडे करत आहेत. तर सिल्लोड-सोयगाव अब्दुल सत्तार व पैठणमध्ये संदीपान भुमरे. कैलास गोरंट्याल हे एकमेव काँग्रेसचे जिल्ह्यातील आमदार आहेत. बहुतांश विधानसभा मतदारसंघात मतांचा टक्का वाढला आहे.

साहजिकच भाजपा (BJP) व महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या कामगिरीकडे व त्यांच्या मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना झालेल्या मतदानाकडे विशेष लक्ष असणार आहे. सर्वाधिक मतदानाची नोंद भोकरदन-जाफ्राबाद या आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघात झाल्याचे समजते. या मतदारसंघात सत्तर टक्के मतदान झाले आहे.

फुलंब्री, बदनापूर, भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना किती मताधिक्य मिळते, यावर विद्यमान आमदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पैठणचे आमदार व मंत्री संदीपान भुमरे, सिल्लोड-सोयगाव अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील दानवेंना मिळालेल्या मतांवर विशेष नजर असणार आहे. सत्तार यांनी यावेळी मित्रधर्म न पाळल्याची चर्चा संपुर्ण मतदारसंघात होताना दिसते आहे.

दुसरीकडे पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे स्वतः छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार असल्यामुळे त्यांची संपुर्ण यंत्रणा तिकडे राबत होती. याचा फटका पैठणमध्ये रावसाहेब दानवे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच रावसाहेब दानवे यांना यावेळी काही दगाफटका झाला तर भाजप आणि महायुतीच्या आमदारांचे भवितव्यही धोक्यात येईल, एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT