Beed Loksabha Election : परळीतील इंजेगावात बुथ ताब्यात घेत बोगस मतदान झाल्याची तक्रार दाखल!

Booth Capturing in Parli : एवढच नाहीतर पालकमंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यासह इतर दहा ते पंधरा लोकांकडून जीवास धोका असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
Parli
Parli Sarakarnama
Published on
Updated on

Parli Political News : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील इंजेगाव येथील बुथ क्रमांक 48 व 49 हे दोन्ही बुथ ताब्यात घेवून याठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावर बोगस मतदान करण्यात आले असल्याची तक्रार सोमवारी मुक्ताराम गवळी यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेवून केली.

एवढच नाहीतर पालकमंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यासह इतर दहा ते पंधरा लोकांकडून माझ्या जीवास धोका असल्याची गंभीर तक्रारही या निवेदनात करण्यात आली आहे.

बीड लोकसभा निवडणूकीसाठी(Beed Loksabha Election) 13 मे रोजी मतदान पार पडले. याच दिवशी परळी तालुक्यातील इंजेगाव येथील मुक्ताराम खेमाजी गवळी व त्यांचे दोन मुले रमेश गवळी, विजय गवळी हे तीन जण येथील बुथ क्रमांक 48 व 49 वर पोलींग एजंट म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे बुथ एजंट म्हणून नेमले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parli
Sandipan Bhumare News: लोकसभा निवडणूक निकालाआधीच भुमरेंना विधानसभा निवडणुकीतही घरी बसवण्याची तयारी...

दरम्यान मतदान प्रक्रिया चालू असताना धनंजय मुंडे यांचे समर्थक विष्णू कराड, अमोल कराड, गजानन कराड, शाम कराड, मारोती रामभाऊ कराड व इतर दहा ते पंधरा लोकांनी त्याठिकाणी येवून मला व माझ्या मुलांना मारहाण करून बुथ ताब्यात घेवून मृत व्यक्तींचे बोगस मतदान केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. आपण व मुलांनी यास विरोध केल्याने आपल्या व कुटूंबियांच्या जिवीताला धोका असल्याचे पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, मतदानाच्या दिवशीही मुक्ताराम गवळी यांनी फेसबुक लाईव्ह करुन मतदान केंद्रातील गोंधळ दर्शविला होता. त्यावेळी त्यांना काही लोक गप्प बसविण्याचा प्रयत्न करत होते.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यात बुथ कॅप्चरिंग, बोगस मतदानाच्या घटना घडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केल्यानंतर या पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही(Rohit pawar) व्हिडीओ पोस्ट करत तसेच आरोप केले. मात्र, जिल्ह्यात बुथ कॅप्चरिंग, बोगस मतदान झाले नसल्याचा अहवाल जिल्हा निवडणुक विभागाने निवडणुक आयोगाला सोमवारी पाठविला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Parli
Beed Lok Sabha News: बीडमध्ये नवा ट्विस्ट! जरांगे-मुंडे वाद सुरु असतानाच बजरंग सोनवणेंची मोठी मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com