Jyoti Mete Sarkarnama
मराठवाडा

Jyoti Mete News : उमेदवारी नाही तरी पण ज्योती मेटेंचे शक्तिप्रदर्शन; काय आहे प्लॅन?

Beed Lok Sabha Constituency : भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात डॉ. ज्योती मेटे सरस उमेदवार ठरतील, असे गणित शिवसंग्रामकडून मांडले जात होते.

Datta Deshmukh

Beed Political News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या डॉ. ज्योती मेटे यांच्याऐवजी बजरंग सोनवणे यांची गुरुवारी उमेदवारी जाहीर केली. यानंतर शुक्रवारी ज्योती मेटे Jyoti Mete जिल्ह्यात शक्तीप्रदर्शनासह दाखल झाल्या. दोनशे वाहनांचा ताफा जिल्ह्याची हद्द असलेल्या राक्षसभुवन फाटा येथून त्यांच्यासोबत होता. जागोजागी त्यांचे जंगी स्वागतही झाले. आता ज्योती मेटे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. Jyoti Mete has big Plan for Beed Lok Sabha Election.

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे Vinayak Mete यांच्या पत्नी ज्योती मेटे राज्याच्या सहकार विभागात राज्याच्या अपर सहनिबंधक या वर्ग एकच्या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात राजीनामा दिला. दरम्यान, बीड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीबाबत त्यांचे नाव चर्चेत होते. पक्षाध्यक्ष शरद पवार Sharad Pawar, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत त्यांच्या बैठकाही झाल्या. मात्र, राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या व मागच्या वेळी लोकसभा निवडणुक लढविण्याचा अनुभव असलेल्या बजरंग सोनवणे यांची उमेदवारी निश्चित झाली.

दरम्यान, गुरुवारी मुंबईत त्यांची राष्ट्रवादीसोबत चर्चा झाल्यानंतर आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर सायंकाळी बजरंग सोनवणे Bajrang Sonvane यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. यानंतर शुक्रवारी ज्योती मेटे जिल्ह्यात येणार असल्याने शिवसंग्रामचे Shivsangram हजारो समर्थक त्यांच्या स्वागतासाठी बीडच्या हद्दीवर थांबून होते. यानंतर दोनशेंवर वाहनांच्या ताफ्यासह त्या बीडमध्ये पोचल्या.

बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच, अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांनाही डॉ. मेटे यांनी अभिवादन केले. आता निवडणुकीबाबत ज्योती मेटे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, दिवंगत विनायकराव मेटे यांनी धनगर समाज आरक्षण, मुस्लिम समाज आरक्षण, मराठा समाज आरक्षणासह Maratha Reservation विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचे उमेदवारांचे वय, शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन, ऊसतोड कामगारांचे प्रश्न आदींबाबत केलेले कामाची सहानुभूती तसेच प्रशासकीय अनुभव यामुळे भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात डॉ. ज्योती मेटे सरस उमेदवार ठरतील, असे गणित शिवसंग्रामकडून मांडले जात होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT